“मराठ्यांची गौरव गाथा”हे ऐतिहासिक महा नाट्य येत आहे लोणावळ्यात 11 डिसेंबर रोजी…

0
126

लोणावळा : लोणावळा नगरपरिषद व मावळ वार्ता फौंडेशन आयोजित शिवदुर्गं मित्र प्रस्तुत मराठ्यांची गौरव गाथा या महानाट्या संदर्भात पत्रकार परिषद संपन्न.

शिवदुर्गं प्रस्तुत मराठ्यांची गौरव गाथा हे ऐतिहासिक महा नाट्य छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जिवनपटावर आधारित प्रसिद्ध व लोकप्रिय महा नाट्य मोफत पाहण्याची संधी पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी येत आहे 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता लोणावळा शहरात तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन या महा नाट्याचा आनंद लुटावा.

पुणे जिल्ह्यातील 2 शे 50 कलाकारांचे व्यासपीठ 10 फूट असा रंगमंच घोडे, उंट, बैलगाड्या असलेले हे भव्य दिव्य महा नाट्य मोफत पाहायला मिळणार असल्याने आत्तापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढत असल्याचे चित्र मावळात दिसून येत आहे.

लोणावळा नगरपरिषद व मावळ वार्ता फौंडेशन आणि शिवदुर्गं मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने मराठ्यांची गौरव गाथा या महा नाट्याचे आयोजन पुरंदरे विद्यालयात मैदान लोणावळा येथे 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता विनाप्रवेश फी करण्यात आले आहे.तरी या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा व आपल्या जिल्ह्यातील कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन यावेळी लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, जेष्ठ नगरसेवक श्रीधर पुजारी, मावळ वार्ता फौंडेशनचे अध्यक्ष सचिन पारेख यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.