मर्दानी खेळामध्ये शिवली गावचा कु. साईराज संदीप आडकर या बालकाने पटकाविले ब्रॉन्झ पदक..

0
74

मावळ : पिंपरी चिंचवड येथे नुकतीच पार पडलेल्या जिल्हा स्तरीय मर्दानी स्पर्धेत शिवली गावातील कु. साईराज संदिप आडकर ब्राँझ पदकाचा मानकरी ठरला.

पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा स्तरीय मर्दानी खेळांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धमध्ये विविध ऐतिहासिक खेळ लाठी काठी, तलवारी बाजी व इतर धाडसी खेळांचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हयातील अनेक स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता.

सर्व स्पर्धकांमध्ये शिवली गावचा कु. साईराज संदिप आडकर पाटील याने उत्तुंग यश संपादन करून ब्रांझ पदकाचा मान मिळवला आहे. इवलुशा वयात कु. साईराज याने यश संपादन करत ब्रॉन्झ पदक पटकाविले आहे. कु. साईराज याच्या या उत्तुंग यशामध्ये त्याची मेहनत व त्याचे प्रशिक्षक किरण आडगळे तसेच वडील शिवली गावचे पोलिस पाटील संदिप आडकर यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.