देहूरोड (प्रतिनिधी): बंगळुरू- मुंबई बायपासवर ताथवडे येथे शिवज्योत घेऊन जाणाऱ्या शिवभक्तांच्या टेम्पोला कंटेनरने जोरदार धडक दिली आहे. ज्यामध्ये 30 ते 35 जण जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवार दि.10 रोजी सकाळच्या सुमारास घडला आहे.
या अपघातात दहा जण गंभीर जखमी झाले आहेत तर वीस जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तीन वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मल्हारगडावरून शिवज्योत घेऊन हे शिवभक्त एका खासगी टेम्पोने लोणावळ्या जवळील शिलाटणे येथे निघाले होते.
या टेम्पोची एका मोटारसायकललाही धडक बसली आहे. यामध्ये मोटारसायकलस्वारही जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.