Tuesday, November 29, 2022
Homeपुणेमावळमळवली बालग्राम येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा 419 नागरिकांनी घेतला लाभ...

मळवली बालग्राम येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा 419 नागरिकांनी घेतला लाभ…

कार्ला (प्रतिनिधी) : मळवली येथे ‘ राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा ‘ अंतर्गत आयोजित कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल 419 नागरिकांनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
शासनाच्या निर्देशानुसार 17 सप्टेंबर 2022 हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीपर्यंत ‘ राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरावडा ‘ हा कार्यक्रम शासनामार्फत राबविण्यात येत आहे . त्याच पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय ,वडगांव मावळ व कार्ला मंडल अधिकारी यांच्या वतीने संपर्क बालग्राम मळवली येथे ‘ शासन आपल्या दारी ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात नायब तहसीलदार रावसाहेब चाटे , कार्ला मंडल अधिकारी माणिक साबळे तसेच तलाठी मीरा बोऱ्हाडे व विविध विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी चर्चा करून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेत तात्काळ सोडविण्याचे सहकार्य केले. या उपक्रमामध्ये कार्ला , वाकसई , कुसगाव गणातील व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत आपल्या अडचणी शासन दरबारी मांडून त्या सोडवून घेतल्या . यावेळी उत्पन्नाचा दाखला , जातीचा दाखला व रेशनकार्ड , आधार कार्ड , निवडणूक ओळखपत्र वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे , महिला भाजपा अध्यक्षा सायली बोत्रे , संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष किरण राक्षे , भाजपा सरचिटणीस मच्छिद्र केदारी , माजी उपसरपंच प्रदिप हुलावळे , शेखर दळवी , सचिन येवले , दत्तात्रय पडवळ , विनायक कोंडभर , दत्ता कोंडभर , रमेश सुतार , मुकुंद मोरे , लतिफ शेख यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page