Friday, September 20, 2024
Homeपुणेपिंपरी चिंचवडमहाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने गुणगौरव व कौतुक सोहळा..

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने गुणगौरव व कौतुक सोहळा..

पिंपरी : ( श्रावणी कामत ) थेरगाव नुकतेच इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये विशेष यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व कौतुक सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या थेरगाव वाकड ताथवडे विभागाच्या वतीने शिव मंदीर सभागृह, शिवकॅालनी, गणेशनगर, थेरगाव,आयोजित करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन मनसे प्रदेश सरचिटणीस रणजित दादा शिरोळे,मनसे शहराध्यक्ष सचिन भाऊ चिखले,मनविसे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत भाऊ डांगे,मनसे जनहित कक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजु भालेराव,उपशहर अध्यक्ष विशाल मानकरी,उपविभाग अध्यक्ष नितीन चव्हाण तसेच प्रभागातील खिंवसरा पाटील शाळेचे मुख्यधापक नटराज जगताप सर, प्रज्ञा विद्यामंदीर संचालक गवळी मॅडम , जगताप सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताथवडे श्री.होले सर मुख्याध्यापक नरसिंह माध्यमिक विद्यालय ताथवडे,परशुराम प्रभु उपस्थित होते, यावेळी थेरगाव येथील अभ्यास टुटोरीअल तर्फे करीअर मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले,यामधुन विद्यार्थी ना पुढिल जिवनात कुठे कश्या संधी निर्माण होतील तसेच पुण्यातील महत्वाचे कॅालेज यावर चर्चा झाली.
यानंतर अनिकेत प्रभु यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व नंतर प्रभागातील ७०% पेक्षा जास्त गुण घेवुन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी चा सत्कार सन्मानचिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन करण्यात आला,यानंतर आता नुकतेच मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न, पुणे जिल्हा पत्रकार संघ कार्यकारिणी पदी निवड झाल्याबद्दल श्री अनिल वडघुले पुणे जिल्हा संघटक पुणे जिल्हा पत्रकार संघ, चिराग फुलसुंदर संघटक पिंपरी-चिंचवड व पुणे शहर, श्रावणी कामत-महिला अध्यक्ष पुणे जिल्हा पत्रकार संघ, मारुती बानेवार समन्वयक पुणे जिल्हा पत्रकार संघ ,सुनिल पवार-कार्यकारिणी सदस्य पुणे जिल्हा पत्रकार संघ,रेखा भेगडे महिला समन्वयक पुणे जिल्हा पत्रकार संघ यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी मनविसे उपशहर अध्यक्ष प्रतिक शिंदे, ओंकार पाटोळे,श्रध्दा देशमुख,सचिव अक्षय नाळे,शरण्य पाटने, किरण पाटील,वि अध्यक्ष-निकीता दुसाणे, सुमित कलापुरे,प्रज्योत पुजारी, महेश बडगुजर, प्रशांत वाघुले हे उपस्थित होते.संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेशजी अवसरे यांनी केले.

कार्यक्रमाचे नियोजन अनिकेत परशुराम प्रभु शहरअध्यक्ष-महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पिंपरी-चिंचवड शहर, सिध्देश बंडु सोनकवडे उपशहरअध्यक्ष मनविसे पिं चिं शहर,विशाल साळुंखे उपविभाग अध्यक्ष चिंचवड यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनिल घोडेकर,संदेश सोनावणे,श्रीकांत धावारे,अमोल शिंदे,निशा प्रभु,धनंजय ताम्हाणे,शंतनु तेलंग,गणेश डांगे,शेखर गांगर्डे,महेश येळवंडे,शुभम वरे,यश कुदळे,यांनी प्रयत्न केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page