Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमहाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्जत शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन !

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्जत शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज दिनांक १९ फेब्रुवारी जयंती दिनी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे कर्जत शहर प्रमुख राजेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत शहरातील डेक्कन जिमखाना येथे त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले . यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा जयघोष करून जयजयकार करण्यात आला.

याप्रसंगी मनसे कर्जत शहर , महिला पदाधिकारी , युवा मनसे यांनी देखील राजे छत्रपतींना अभिवादन करून मानाचा मुजरा केला . यावेळी पुष्पहार अर्पण करताना उपस्थित सौ. योगिता श्रृंगारपुरे – कर्जत तालुका महिला सचिव , राजेश साळुंखे – कर्जत शहर प्रमुख , मयुरेश जोशी – उपशहर अध्यक्ष , प्रदीप पाटील – माजी तालुका सचिव , ललित वाईकर – माजी तालुका सचिव विद्यार्थी सेना , महेंद्र आव्हाड , महेश छत्तीसकर , सुप्रिया बारमुख , लोकेश शृंगारपुरे , त्याचप्रमाणे अनेक मनसे सैनिक यावेळी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page