Saturday, September 21, 2024
Homeपुणेलोणावळामहाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या पुणे ग्रामीण युवक आघाडी जिल्हाध्यक्षपदी साकीब शफीक अत्तार...

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या पुणे ग्रामीण युवक आघाडी जिल्हाध्यक्षपदी साकीब शफीक अत्तार यांची नियुक्ती..

लोणावळा : दि .५ ऑगस्ट महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने साकीब शफीक अत्तार यांची पुणे ग्रामीण युवक आघाडी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. श्री. राहुल अर्जुनराव दुबाले, संस्थापक आणि अध्यक्ष, तसेच महाराष्ट्र राज्य शासन गृह विभाग पोलीस निराकरण, समन्वय समिती सदस्य यांनी ही माहिती दिली आहे.
लोणावळा येथील रहिवासी साकीब शफीक अत्तार यांना संघटनेच्या राज्य विस्तार आणि मजबुतीकरणासाठी महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असणारे आणि समाजासाठी योगदान देण्याची आवड असलेले साकीब अत्तार हे त्यांच्या कार्यक्षमतेमुळे ओळखले जातात. त्यांच्या मेहनतीने आणि समर्पणाने संघटनेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
संघटनेच्या ध्येय, निती, आणि उद्देश डोळ्यासमोर ठेवून पोलिसांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी भविष्यातील प्रयत्नांसाठी अत्तार यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या आहेत.
संघटनेच्या पुढील विकासासाठी अत्तार यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page