महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या पवना नगर येथील कार्यकर्त्यांची निवड…

0
148

लोणावळा : महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या पवना नगर येथील वाहतूक सेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे पत्रक अध्यक्ष उदय दळवी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

महाराष्ट्र भर कार्यरत असणाऱ्या व चर्चेत असणाऱ्या वाहतूक सेनेची गगनचुंबी भरारी सुरु असून आज लोणावळा तुंगार्ली येथे शिवसेनेचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी यांच्या हस्ते पवना नगर येथील पदाधिकाऱ्यांना पद वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी उपतालुका प्रमुख अमित कुंभार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थित कार्यकर्त्यांच्या हस्ते वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी यांचे पुष्प गुच्छ व शाल देऊन जंगी स्वागत करण्यात आले.

यादरम्यान नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करताना सचिन चंद्रकांत कालेकर यांची मावळ तालुका उपाध्यक्ष पदी, संतोष आबू कालेकर यांची पवन मावळ अध्यक्ष पदी, व एकनाथ नामदेव कालेकर यांची पवन मावळ उपाध्यक्ष पदी तसेच पवना नगर शहर प्रमुख पदी दिनेश राजे यांची निवड करण्यात आली या निवडीचे पत्रक महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी यांच्या हस्ते सर्वांना प्रदान करण्यात आली.

नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश केदारी यांनी मार्गदर्शन करताना सर्व पदाधिकारी यांना पक्ष वाढीसाठी काम करण्याच्या शुभेच्छा दिल्या तसेच अध्यक्ष उदय दळवी यांनी कारकर्त्यांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्याप्रमाणे मावळ तालुक्यातील वाहतूक सेनेचे कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत व यापुढे काम करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा व पक्ष वाढीसाठी प्रामुख्याने वाहतूक दारांच्या अडचणी सोडवाव्यात आणि प्रत्येक जन उत्तम कार्य करतील अशा सदिच्छा दिल्या.

यावेळी महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश केदारी, शिवसेना उप तालुका प्रमुख अमित कुंभार, वाहतूक सेना लोणावळा शहर अध्यक्ष शांताराम कडू, माजी नगरसेवक मधुकर पवार, पवना नगर माजी उपसरपंच अनिल भालेराव यांसमवेत इतर कार्यकर्ते उपस्थित होते.