Friday, June 9, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडमहाशिवरात्रीच्या दिनी शिव - पार्वतीचे अनोखे दर्शन !

महाशिवरात्रीच्या दिनी शिव – पार्वतीचे अनोखे दर्शन !

कडाव येथे श्री कैलास शिव मंदिरात महाशिवरात्री जल्लोषात साजरी…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) शिव म्हणजे शून्य , शिव म्हणजे निराकार , शिव म्हणजे ब्रह्मांड , शिव म्हणजेच शक्ती , शिव म्हणजे समाधी , शिव म्हणजे भोळा शंकर , शिव म्हणजेच करूनाकार , चार धाम , बारा ज्योतिर्लिंग जगात प्रसिद्ध आहे , अश्या शिव चरणी नतमस्तक होऊन स्वतः संन्यासी जीवन जगत कर्जत तालुक्यातील नागरिकांच्या जन कल्याणासाठी कडाव येथे टाटा रोड वरील श्री कैलास शिव मंदिरात चार वर्षांपूर्वी शिवभक्त सविता सोनवणे यांनी स्वकष्टाने उभे केलेल्या शिव मंदिरात आज ” महाशिवरात्री ” च्या दिनी महापूजा करून प्रार्थना करण्यात आली.यावेळी पहाटे पासूनच तालुक्यातील मोठया प्रमाणात शिवभक्त दर्शनासाठी येऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी शिव – पार्वतीचे हेबुहेब वेशभूषा केलेले बद्रेश सोलंकी व त्यांची पत्नी यांनी अनोखे दर्शन सर्व शिव भक्तांना घडविले.कर्जत नगर परिषद हद्दीत मुद्रे येथे रहाणाऱ्या शिवभक्त सविता सोनवणे यांनी चार वर्षांपूर्वी कडाव टाटा रोडला जागा घेऊन येथे शिव मंदिर उभे केले , पूर्वी येथे छोटेसे शिव मंदिर होते ,येथील नागरिकांचे कल्याण व्हावे , सर्व दुःख दूर व्हावे , यासाठी त्यांच्या गुरूंनी त्यांना आज्ञा दिली होती की , येथे भव्य शिव मंदिराची प्रतिष्ठापना करा , यामुळेच त्यांची प्रेरणा घेऊन शिव मंदिर उभे राहिले आहे , मी एक माध्यम असल्याचे मत शिवभक्त सविता सोनवणे यांनी व्यक्त केले.आज दि.१८ फेब्रुवारी २०२३ महाशिवरात्री च्या दिनी कडाव टाटा रोडवर असलेले श्री कैलास या शिव मंदिरात पहाटे पासूनच शिवभक्तांनी शिव पिंडीचे दर्शन घेण्यासाठी रिघ लावली होती.
तालुक्यातील तसेच मुंबई भागातून आलेल्या तीन हजाराच्या आसपास भाविकांनी येथे दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला . दिवसभर पूजा – अर्चा , होम हवन , महाआरती , भजन , शिव – पार्वती लग्न समारंभ , त्यांचे अनोखे दर्शन असे विविध कार्यक्रम झाले . यावेळी दर्शन घेण्यासाठी आलेल्या शिव भक्तांना शिव भक्त सविता सोनवणे यांनी स्वतः महाप्रसाद वाटला.
संगेमरमर च्या दगडात कोरीव नक्षीकाम केलेल्या या मंदिराचे स्वरुप अलौकिकच आहे. गाभाऱ्यात शिव पिंडीच्या पाठीमागे आदिशक्ती ची मूर्ती असे अचंबित करणारे हे थोड्याच अवधीत प्रसिद्ध झालेले शिव मंदिर तालुक्यातील तीर्थस्थान झालेले असून शिव महिमा त्यानिमित्ताने दिसत आहे . दुसऱ्या दिवशी उपवास व्रत करणाऱ्या भाविकांना भंडाऱ्याचे नियोजन करून अन्नदान करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page