Friday, September 20, 2024
Homeपुणेमहिलांनी समाजकार्यात पुढे येऊन एकजूट होऊन सक्षमीकरण होणे काळाची गरज - अनिता...

महिलांनी समाजकार्यात पुढे येऊन एकजूट होऊन सक्षमीकरण होणे काळाची गरज – अनिता काळे..

पुणे येथे राजमाता जिजाऊ, क्रांती जोती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर,त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर,माई सिंधुताई सपकाळ राज्यस्तरीय पुरस्काराने विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान..
पुणे : प्रतिनिधी (श्रावणी कामत ) आजच्या युगातील महिलांनी समाजकार्यात पुढे आले पाहिजे, तसेच एकजूट होऊन होणाऱ्या सक्षमीकरण होणे काळाची गरज तर सध्याच्या काळात महिला विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात येत असून महिलांनी संघर्ष करून न्याय मिळवून घेतला पाहिजे, महिलांनी राजकारणात आले पाहिजे तसेच स्वत:मधील क्षमता ओळखून तीने स्वयंपूर्ण व्हायला हवे, असे प्रतिपादन मराठा समन्वय परिषद महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे यांनी केले.

सृष्टी सेवा भावी संस्थेच्या वतीने पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे रविवार दि २६ में रोजी आयोजित राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर,माता रमाबाई आंबेडकर,माई सिंधुताई सपकाळ राज्यस्तरीय पुरस्काराने विविध क्षेत्रातील महिलांचा पुरस्कार प्रदान समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिता काळे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय फिल्म सल्लागार समितीच्या सदस्या डॉ स्मिता बारवकर, डॉ भावना शेवनकर संगीता गुरव, सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा जगताप, अनुराधा सरवदे आदी महिला मान्यवर उपस्थित होत्या.
पुढे अनिता काळे म्हणाल्या की महिला मुळातच सक्षम असते तर कोणतेही आव्हानात्मक काम तीने मनावर घेतल्यास ते काम ती सहज पूर्ण करु शकते.सकारात्मक पणे काम करायला हवे, महिलांना यशस्वी होण्याच्या वाटचालीत मदत करणाऱ्या पुरुषाचाही हात आहे, तसेच महिलांनी स्वतः विविध क्षेत्रात काम करायला हवे जेणेकरून संसार करून स्वावलंबी व्हायला हव्यात आज या सर्व विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सृष्टी सेवा भावी संस्थेने पुरस्कार देऊन सन्मान केला या संस्थेचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे असेही त्या यावेळी म्हणाल्या.याक्रमाचे आयोजन सृष्टी सेवा भावी संस्था अंबाजोगाई जि बीडच्या अध्यक्षा मिनाक्षी विकास डोंगरे, उपाध्यक्षा माधुरी प्रविण साळवे, सचिव भारती अशोक एकलारे, विकास डोंगरे,वर्षा जाधव, त्रिवेणी मोघे, आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम,संजय पवार आदींनी परिश्रम घेतले तर प्रास्ताविक त्रिवेणी मोघे यांनी केले या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन अलका जोशी यांनी केले.तर आभार अविनाश कदम यांनी मानले.

राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले,अहिल्याबाई होळकर, माता रमाबाई आंबेडकर , माई सिंधुताई सपकाळ राज्यस्तरीयपुरस्काराने या महिलांना गौरविण्यात आले.

जिजाऊ पुरस्कार..

सौ श्रीमती स्वाती साहेबराव नाट, श्रीमती रेश्मा जगताप,सौ विद्या संतोष चव्हाण, सौ श्रावणी धनंजय कामत,सौ सुवर्ण प्रवीण मोरे ,सौ मेघना मयूर मुलालिक ,सौ‌ अरूना अच्युत मोरे, सौ स्नेहल मंगेश मानकर ,सौ रूपाली शामराव जाधव ,सौ उर्मिला संतोष माने ,सौ अनुराधा रवींद्र सरवदे, सौ वर्षा संदीप काळे, सौ भारतीय नवनाथ उमाळे, सौ मनीषा प्रदीप पवार, उत्सव पुनम मयूर भोर ,सौ रेश्मा माणिकराव जगताप, सौ रेश्मा शिवाजी दिघे , सौ स्मिता बारवकर,श्रीमती मयुरी लक्ष्मण नवले, सौ कल्याणी योगेश साबळे ,सौ लीना बाळासाहेब पांडे, सौ ज्योती संजय पवार,

आहिल्यादेवी होळकर पुरस्कार

सो अंजना संजय येवले, सौ संगीता कृष्णदेव गुरव, सौ संगीता राजेंद्र ठोसर, सौ वैजयंता अनिल कुजीर ,सौ आशा सुरेंद्र कांबळे, सौ प्रतिभा प्रल्हाद भिसे ,सौ शोभा नामदेव भालसिंग सौ कामिनी नामदेव टकले, सौ विभावरी महेश गुरव ,सौ धनश्री मिलिंद गुरव ,श्रीमती स्वाती राजू जगदाळे, सौ मीनाक्षी सोमनाथ जाधव, श्रीमती इंदू हनुमंत गोडसे, कुमारी लीना श्रीराम तेले ,सौ अलका जोशी, कुमारी घुगे.

माता रमाबाई आंबेडकर पुरस्कार

सौ माधवी रवींद्र सूर्यवंशी, सौ मनीषा संदीप चव्हाण, या विद्याताई गडाख,श्रीमती सुमन रवींद्र पवार ,सौ अर्चना नारायण येरवडे , सौ अनुराधा सरोदे,सौ मीना अशोक शिर्के ,सौ संगीता शिवाजी शिंदे ,सौअनिता लक्ष्मण काळे ,डॉक्टर भावना मंगेश शेनकर, सौ रीना जाधव, सौ‌ गीता मोहन चापके, सौ मीरा जाधव ,तृप्ती काळे, श्री तृप्ती सागर भवन, सौ कमल बाळासाहेब ढाताळ, सौ भावना घाणेकर, छाया प्रकाश अमरुळे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार

उर्मिला घाणेकर ,सौ कविता रवींद्र डोंगरे, सौ त्रिवेणी शिवाजी मोघे, सौ डॉक्टर शुभांगी गणेश गादेगावकर ,सौ रश्मी अमर सरोटे, सौ पूजा निखिल देशमुख, ऋतुजा भगवत कोरम ,मा सौ वंदनाबाई तेजराव हिरे, गीतांजली मल्लिकार्जुन बनसोडे, श्रीमती संगीता रघुनाथ घोडके, सौ माधवी प्रवीण तेले ,सौ अनिता दिलीप पवार ,रश्मी नरेंद्र जोशी ,सौ मनीषा प्रफुल गायकवाड ,श्रीमती प्रीतम राहुल भेंडकर, सौ डॉक्टर सविता प्रकाश गायकवाड ,श्रीमती योगिता संजय कोठेकर ,सौ पल्लवी लक्ष्मण कुलथे, सौ श्वेता निलेश बोधे ,सौ सुप्रिया अमित उवरकर ,सौ गिता हरीश सपकाळ, श्रीमती निर्मला नरेंद्र बनसोडे, सुमंनाजली शकुंतलाबाई गुन्हेजी बनसोडे, लता खंडू बोराटे, श्रीमती शैला जिजाबा जांभाळकर,

माई सिंधुताई सपकाळ पुरस्कार

कु. चैत्राली किशोर राजापूरकर सौ योगिता अनिल जायभाय, श्रीमती सदैवती वीरेंद्र कसळसकर, सौ वैशाली रविंद्र कुंभार, श्रीमती वृषाली विकी संगोलिया ,सौ वैशाली प्रकाश घोरपडे सौ अरुणा महेश काकडे, सौ अरुण अनुराधा महादेव घुगे ,सौ राजश्री अजय आढाव ,श्रीमती उषा कांबळे ,सौ नीलम भीमराव नाकाडे ,सौ मनीषा ज्ञानेश्वर शिर्के ,श्री सुवर्णा बळीराम जाधकर, सौ मयुरी यशवंत गानू, श्रीमती दैना सुनील पावडे, सौ मीरा बाळासाहेब बेरड ,श्रीमती किशोरी शिवाजी भोर ,अनिता लक्ष्मण काळे या विविध क्षेत्रातील महिलांना सन्मानित करण्यात आले.

- Advertisment -

You cannot copy content of this page