महिला सुरक्षा बाबत लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून सूचना व मार्गदर्शक पत्रके वाटप…

0
98

लोणावळा दि.3 : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचा अभिनव उपक्रम महिला सुरक्षाअंतर्गत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांना सूचना व मार्गदर्शक पत्रके वाटप.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे व लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट येथील महिला पर्यटक व स्थानिक महिला व्यावसायिक यांना सुरक्षे संदर्भात निर्भया पथकाच्या माध्यमातून त्यांना सतर्क राहण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पत्रके वाटप करण्यात आली आहेत.

महिलांवरील अत्याचार थांबाविण्यासाठी महिलांनी सक्षम असून सतर्क कसे राहावे याबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले आहे. महिला सुरक्षा संदर्भात जनजागृती करणे गरजेचे असल्यामुळे हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

यावेळी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, महिला पोलीस घुगे मॅडम व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.