Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" महेंद्र शेठ थोरवे यांची यशस्वी घौडदौड "…

” महेंद्र शेठ थोरवे यांची यशस्वी घौडदौड “…

अनेक महिला पदाधिकारी व मनसे सैनिकांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश !

कर्जत तालुक्यात मनसेची गळती संपेना…..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )कर्जत खालापूर मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या निवडणुकीत खूप मोठी गळती लागली असून या मतदार संघात मनसे चा उमेदवार नसल्याने अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेल्याचे चित्र येथे पहाण्यास मिळत आहे . या मतदार संघातील ” विकास पुरुष ” आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे नेतृत्व सर्वानाच आकर्षित करत असून बहुसंख्य मनसे सैनिक शिवसेनेत पक्ष प्रवेश करून त्यांचे नेतृत्व स्वीकारत आहेत .

रविवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्व व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला जिल्हाअध्यक्षा सौ. सपना किरण राऊत , महिला जिल्हासचिव सौ.आकांशा रांकित शर्मा , मा.तालुका अध्यक्षा योगिता शृंगारपुरे , उपतालुका अध्यक्षा सौ. रंजना वाघ यांनी शिवतीर्थ पोसरी – कर्जत येथे शिवसेना पक्षात प्रवेश केला. या प्रमुख महिला पदाधिकारी समवेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेकडो कार्यकर्त्यांनी देखील शिवसेना पक्षात प्रवेश केला.

या पक्षप्रवेश सोहळ्या प्रसंगी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या समवेत शिवसेना कर्जत तालुका प्रमुख सुदामदादा पवाळी , सौ.मीनाताई थोरवे , सौ.मनीषा थोरवे , सौ.लता थोरवे , सौ.मीराताई थोरवे , महेंद्र नीगुडकर , तालुका प्रवक्ते विलास श्रीखंडे , किरण राऊत , समीर चव्हाण , रवींद्र राऊत व शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व शिव सैनिक उपस्थित होते .
- Advertisment -

You cannot copy content of this page