![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
वक्तव्याचा जाहीर निषेध , माफी मागा अन्यथा तीव्र आंदोलन करणार – सुधाकर घारे..
भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) दोनच दिवसांपूर्वी कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते , मोठ्या उत्साहात समाजपयोगी कार्यक्रम यावेळी होत असताना भावनिक भाषणाने संपूर्ण सभा जिंकणारे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी रायगडच्या माजी पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्या बद्दल जे वक्तव्य केले या वक्तव्यामुळे कर्जत खालापूर मतदार संघाचे वातावरण चांगलेच तापले असून , या वक्तव्याचा समाचार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व राजिप चे माजी उपाध्यक्ष सुधाकर शेठ घारे यांनी रॉयल गार्डन येथे पत्रकार परिषद घेऊन आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी महिलांप्रती माजी राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्या बद्दल बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध करून , ” माफी मागा , अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार ” असा संतापजनक ईशारा दिला आहे.
कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचे बेताल वक्तव्य आदिती ताई तटकरे यांच्या बाबतीत हे पुरोगामी महाराष्टात भगिनी – महिलांना असे बोलणे शोभत नाही , हे सांगत सुधाकरशेठ घारे म्हणाले की , अदितीताई तटकरे यांनी कोरोना काळात चांगले काम केले ,त्यावेळी देखील येथील आमदारांनी बेताल वक्तव्य केले होते , त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शक्ती प्रदर्शन केले पण त्यांची बोलताना जीभ घसरली , शक्ती प्रदर्शन करताना त्यांना बस मधून माणसे आणावी लागली , वाढदिवस निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात शासकीय अधिकारी कसे , याचा जाब विचारणार असल्याचे त्यांनी म्हटले.
एका बाजूने बचत गटातील महिलांना एकत्र आणायचे व एका बाजूने एका माजी राज्यमंत्री राहिलेल्या अदितीताई यांना बेताल वक्तव्य करणे चुकीचे आहे , कर्जत – खालापूर मतदार संघात दबाव तंत्राचा वापर करून बिहार करण्याचा कार्यक्रम येथील आमदारांचा सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला . मागील सत्तेत रायगडात ३ आमदार यांचे असून मंत्रिपद दिले नाही , म्हणून यांची ओरड होती , मात्र तुम्ही लायक नसाल , म्हणूनच तुम्हाला डावळले , यावर प्रकाश टाकत , जे उद्धव साहेबांचे झाले नाहीत , तर आपले कसे होणार , असा घणाघाती प्रहार त्यांनी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्यावर केला.
अदितीताई मंत्री झाल्या तर इंग्रजीत प्रश्न मांडू शकतात , तुम्हाला ते जमणार नाही . मुंबईत अधिवेशन सुरू असताना हे आता युरोप ला फिरायला गेले होते , अशी टीका देखील त्यांनी केली.अदितीताई तटकरे यांचे आजोबा सभापती , वडील खासदार सुनील तटकरे साहेब हे चार वेळा आमदार म्हणून निवडून येऊन चार वेळा मंत्री झाले , तर आदितीताई स्वतः राजिप च्या अध्यक्षा , मंत्री असून सक्षम असणारे महिला व्यक्तिमत्व आहेत .माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या बद्दल देखील मागे त्यांनी खोटं विधान केले होते , त्यावेळी मा. आमदार सुरेशभाऊ लाड यांनी चर्चा करण्याचे आवाहन केले होते , मात्र आमदार थोरवे यांनी ते स्वीकारले नाही , याची आठवण देखील त्यांनी यावेळी केली.
म्हणूनच आमदार महेंद्र थोरवे यांनी अदितीताई तटकरे यांच्याबद्दल केलेले चुकीच्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करून त्यांनी माफी मागावी ,अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा , राजिप चे माजी उपाध्यक्ष सुधाकरशेठ घारे यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला . यावेळी त्यांनी रायगड पोलीस अधीक्षक यांना देखील आवाहन केले की , यांच्या विरोधात गेल्यास पोलीस अधिकारी , पोलीस यंत्रणेच्या बदल्या होतात , हे योग्य आहे का , पक्षाच्या कार्यक्रमाला शासकीय अधिकारी उपस्थित , हे योग्य आहे का , प्रशासन आमदारांच्या दबावाखाली असल्याचे चित्र येथे आहे , हे सांगितले . तर पुढील तीव्र आंदोलन हे माजी आमदार व पक्षश्रेष्ठीं सुरेशभाऊ लाड यांच्या नेतृत्वाखाली होईल असे त्यांनी सांगितले.
तर राष्ट्रवादी कर्जत ता.महिला अध्यक्ष रंजना धुळे यांनी देखील बेताल वक्तव्य करणारे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा जाहीर निषेध केला . येथील महिलावर्ग सुरक्षित आहेत का ,असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला , म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांनी माफी मागावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा ईशारा दिला . एकनाथ धुळे म्हणाले की , येथील आमदारांनी अदितीताई यांना ” शेंबडी मुलगी ” म्हटलं , हे चुकीचे वक्तव्य आहे , म्हणून त्यांनी जाहीर निषेध केला . तर अशोक भोपतराव यांनी आमदारांची संस्कृती चुकीची आहे , हे म्हणत सांप्रदायिक कुटुंब असताना असे महिलांबद्दल बेताल व चुकीचे वक्तव्य करणे निंदनीय असून माफी मागावी , अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू , असा ईशारा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने दिला.
यावेळी या पत्रकार परिषदेत मा. राजिप उपाध्यक्ष सुधाकरशेठ घारे , यांच्या समवेत जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोपतराव , माजी सभापती एकनाथ दादा धुळे , कर्जत ता. अध्यक्ष भगवान शेठ चंचे , महिला ता.अध्यक्षा ऍड . रंजना धुळे , मा.सरपंच मधुकर घारे , उर्मिला कैलास विचारे ,मनीषा भगवान पाटील – तालुका महिला उपाध्यक्ष , वंदना संतोष थोरवे महिला उपाध्यक्ष , भारती भानुदास पालकर – नगरसेविका , भानुदास पालकर , सोमनाथ पालकर , आर के कोळंबे ,बंधू देशमुख , छोट्या देशमुख , केतन बेलोसे , चव्हाण , त्याचप्रमाणे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.