Wednesday, October 16, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमाथेरानला पर्यटनाचा आनंद घेयाला या,पण मास्क घालूनच या..

माथेरानला पर्यटनाचा आनंद घेयाला या,पण मास्क घालूनच या..

माथेरान (दत्ता शिंदे)
लॉक डाऊन काळात घरात बसून कंटाळून गेल्यामुळे सर्व पर्यटनस्थळे केव्हा एकदा खुली केली जात आहेत याची पर्यटक वाट आतुरतेने पहात होते.सर्वांचे आवडते पर्यटनस्थळ म्हणून माथेरान हे एकमेव स्वस्त दरात एकदिवसीय ठिकाण सर्वांनाच परिचित आहे त्यामुळे माथेरान अनलॉक केल्यामुळे अनेकांनी या स्थळाला अधिकाधिक पसंती दिली आहे.

कोरोनाचा सामना तर करावयाचा आहेच परंतु शासनाने दिलेल्या नियम व अटींचे देखील तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे.सोशल डिस्टन्स त्याचप्रमाणे सॅनिटायझरचा वापर आणि खासकरून गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे हे बंधनकारक आहे. वेळोवेळी सूचना करून सुध्दा अनेकजण मास्कचा वापर करताना आढळून येत नाहीत.

राज्यातील ठराविक पर्यटनस्थळे खुली केलेली आहेत त्यात माथेरान मधील नागरिकांचे संपूर्ण जीवनमान हे पर्यटनावर अवलंबून आहे. लॉक डाऊनच्या कठीण समयी इथल्या स्थानिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते.एक विशेष बाब म्हणून हे पर्यटन सुरू केल्यामुळे आज इथला भूमिपुत्र सुखाने दोन घास आपल्या कुटुंबासह खात आहे.

माथेरान मध्ये कोरोना रुग्णांची संख्या नगण्य आहे तरीसुद्धा येणाऱ्या पर्यटकांमधून एखादेवेळी कोरोनाची बाधा उद्भवू शकते त्यामुळे पर्यटकांनी सुध्दा खासकरून काळजी घेत शासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

ऐन गर्दीच्या वेळी विना मास्क अनेकजण फिरत असतात अशांवर कारवाई करण्यात येत असून नगरपरिषदेच्या आणि पोलीस ठाण्याच्या माध्यमातून विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जात असून पाचशे रुपये दंडाची रक्कम वसूल केली जात आहे त्यामुळे माथेरान मध्ये येणाऱ्या पर्यटकांनी मास्कचा वापर करून इथे प्रवेश करावा अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisment -

You cannot copy content of this page