Monday, November 28, 2022
Homeमहाराष्ट्ररायगडमाथेरान येथील अश्वपाल संघटनेने घेतली आमदार महेंद्रशेठ थोरवे यांची भेट !

माथेरान येथील अश्वपाल संघटनेने घेतली आमदार महेंद्रशेठ थोरवे यांची भेट !

अनेक विषयांवर झाली चर्चा , अडचणी सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध , दिले अभिवचन…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका म्हटलं की , थंड हवेचे ठिकाण गिरीस्थान माथेरान हे सर्वांच्याच तोंडी येते , मात्र आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात होत असलेल्या बदलावंमुळे माथेरान येथे ही खूप मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत . त्यामुळे पूर्वापार उपजीविकेचे साधन असलेले व्यापारी वर्ग , अश्वपाल , माल वाहतूक करणारी साधने , आताचे ई – रिक्षा धारक यांना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.
भविष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी याच पार्श्वभूमीवर येथील अश्वपाल संघटनेने कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांची भेट घेतली . यावेळी मोठ्या प्रमाणात माथेरानकर भेटीस येऊन त्यांच्या समस्या सांगण्यात आल्या.यावेळी रिक्षा तसेच एमएमआरडी च्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाबाबत चर्चा करण्यात आली. तर अश्वपाल संघटनेला भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणीं लक्षात घेऊन आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी अश्वपाल संघटनेला मार्गदर्शन केले व भविष्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही कटबद्ध आहोत असे अभिवचन दिले.
तर भविष्यात माथेरान येथे फक्त पॉईंट बघण्यास पर्यटकांवर भर न देता , ” इमॅजिका पार्क ” उभारून जास्तीत जास्त पर्यटक कसे येतील , यावर भर दिला जाईल , तसा प्रस्ताव देखील सादर केल्याचे , आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी माथेरानकरांना सांगितले . त्यामूळे झालेल्या भेटीत माथेरान अश्वपाल संघटनेचे पदाधिकारी , तसेच इतर नागरिकांचे विश्वास संपादित झाले , असेच एकंदरीत चित्र येथे पहाण्यास मिळत आहे .
- Advertisment -

You cannot copy content of this page