Sunday, April 2, 2023
Homeक्राईममावळातील धक्कादायक घटना, बापानेच केली सख्या मुलाची हत्या...

मावळातील धक्कादायक घटना, बापानेच केली सख्या मुलाची हत्या…

तळेगाव (प्रतिनिधी) : बापानेच मुलाचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि.1 रोजी दुपारी 3 च्या सुमारास सुदुंबरे, बोरकरवाडी येथे घडली. बापानेच मुलावर कुऱ्हाडीचा घाव घालून हत्या केली व नंतर मी माझ्याच पोराला मारले म्हणून बाप घराबाहेर आल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली
समीर बाळू बोरकर ( वय 34 , रा . बोरकरवाडी , सुदुंबरे , ता . मावळ ) असे खून झालेल्या मुलाचे नाव असून पोलिसांनी बाळू बबन बोरकर ( वय 55 ) याला हत्या प्रकरणी ताब्यात घेतले आहे . याप्रकरणी समीर याच्या भावाच्या पत्नीने ( वय 28 ) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू हा शेती आणि पशुपालन करत होता . मुलगा समीर हा नियमीत काम करत नव्हता . त्याला दारूचे व्यसन होते . त्याच्या वागणूक आणि सवयींमुळे त्याचे लग्न जमत नसल्याने वडील बाळू आणि समीर यांचा वारंवार वाद होत असे . बाळू यांची थोरली सून फिर्यादी पूनम मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घरात स्वयंपाक करीत होती . त्यावेळी दिर समीर हा टीव्ही पाहत हॉलमध्ये झोपला होता . यावेळी आरोपी बाळू बोरकर अचानक घरी आले व त्यांनी कुऱ्हाड उलट्या बाजूने समीरच्या डोक्यात मारुन त्याचा खून केला.
बाळू रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन ‘ मी समीरला मारले ‘ असे म्हणत बाहेर आल्यानंतर पूनम यांनी हॉलमध्ये जाऊन बघीतले असता समीर हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला होता . खुनाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत व सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार पांडे यांनी धाव घेत पंचनामा केला . मृतदेहाचे शवविच्छेदन केले . आरोपी बाळू बोरकर याला ताब्यात घेत अटक करून वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले आहे . या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार पांडे करत आहेत .

You cannot copy content of this page