मावळातील शिरपेचात मानाचा तुरा ,खेलो इंडिया वेटलिफ्टिंगमध्ये महेश असवलेला सुवर्ण पदक…

0
42

मावळ : बेंगलोर येथे पार पडलेल्या खेलो इंडिया वेटलिफ्टींग स्पर्धेत टाकवे बुद्रुक येथील महेश असवलेने पटकाविले सिल्व्हर पदक.

खेलो इंडिया वेटलिफ्टींग स्पर्धेत टाकवे येथील महेश असवलेला सिल्व्हर पदक मिळाल्याने मावळ तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे . बेंगलोर येथे पार पडलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स वेटलिफ्टिंग स्पर्धेत मावळ तालुक्यातील टाकवे येथील 22 वर्षीय महेश दत्तात्रय असवले याने 67 वजनी गटात एकुण 264 किलो वजन उचलून सिल्व्हर पदक मिळवीले . यापूर्वी झालेल्या खेलो इंडिया स्पर्धा मध्ये महेशने दोन गोल्ड व आता सिल्व्हर पदक मिळवले आहे.

महेश असवले हा बिहारारीलाल दुबे , आनंद जांभूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुबेज गुरुकुल वडगाव मावळ येथे सराव करत आहे . खेलो इंडियामध्ये नेत्रदीपक कामगिरी करत सिल्व्हर मेडल प्राप्त केल्याबद्दल महेशचे मावळ तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.