Thursday, June 1, 2023
Homeपुणेमावळमावळातील 45 लाभार्थी महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या संपन्न...

मावळातील 45 लाभार्थी महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या संपन्न…

पवनानगर : प्रतिनिधी   पवनानगर येथील ग्रामीण रुग्णालय काले कॉलनी येथे दिनांक 25 मार्च 2022 रोजी दुर्बिणीद्वारे 45 स्त्री लाभार्थ्यांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

या शिबिरासाठी पवन मावळातील 32 स्त्रिया व लोणावळा येथील 13 अशा एकूण 45 स्त्री लाभार्थ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली.

या शिबिरासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गजरे हे जिल्हा परिषदेकडून शस्त्रक्रिया करण्यासाठी उपस्थित होते तसेच डॉ.सोनावणे, डॉ वर्षा पाटील, डॉ. वास्तर, डॉ अदाते, डॉ अरोटे, अधीपरीचारिका व इतर कर्मचारी वर्ग शिबिरासाठी उपस्थित होते. या शिबिरासाठी विशेष नियोजन करून सर्व लाभार्थ्यांना चहा, नाश्ता, जेवण, रात्री थांबण्याची सोय व सुसज्ज ऑपरेशन थिएटर तयार ठेवण्याचे विशेष काम वैद्यकीय अधीक्षक डॉ.इंद्रनील पाटील यांनी बजावले.

तसेच त्यांनी विशेष लक्ष घालून शिबिर आयोजन केले व यशस्वी रित्या पूर्ण सुद्धा केले. व यापुढेही अनेक विभिन्न शस्त्रक्रिया शिबिर आयोजन करण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page