मावळ कन्या हर्षदा गरुड हिने ग्रीस मध्ये सुवर्ण पदक मिळवून भारताचे उघडले खाते…

0
105

अष्ट दिशा : भारतीय वेटलिफ्टर हर्षदा शरद गरुड हिने ग्रीसमधील IWF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताचे खाते उघडले .

विशेष अभिमानाची बाब म्हणजे हर्षदा ही वडगाव मावळ येथील दुबेज गुरुकुलची खेळाडू आहे . दुबेज गुरुकुलचे प्रमुख प्रशिक्षक बिहारीलाल दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली 2019 मध्ये ताश्कंद येथील आशियाई स्पर्धेत ज्युनिअर गटात हर्षदा गरुड हिने कास्य पदक पटकावले होते . आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणारी दुबेज गुरुकुलमधील ही दुसरी खेळाडू आहे . मार्च 1990 मध्ये जागतिक क्रॉसकंट्री स्पर्धेत वैशाली खामकर हिने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते .

वडगाव मावळ ही वेटलिफ्टींगची पंढरी म्हणून ओळखली जाते. हर्षदाच्या या यशाने मावळ तालुक्याबरोबरच संपूर्ण भारतातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.