लोणावळा : काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असणारे युवा कार्यकर्ते तसेच मावळ तालुका काँग्रेस प्रवक्ते फिरोज नजीर शेख यांनी प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेस पक्षातील लोणावळा शहरात अनेक चळवळीत सक्रिय असणारे फिरोज शेख यांनी तसे पत्रक मावळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांच्या कडे सुपूर्द केले आहे.
लोणावळा नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत ते गावठाण मेमन मस्जिद वार्ड मधून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरु असताना ऐन निवडणुकीच्या वेळी फिरोज शेख यांनी राजीनामा दिल्याने याचा लोणावळा नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसणार असल्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविली जात आहे. फिरोज शेख यांचे ऐन वेळी राजीनामा देण्याचे कारण स्पष्ट झालेले नसले तरी शहरातील काँग्रेस कमिटीचे दुफाळी राजकारण यास कारणीभूत असल्याचा अंदाज मुस्लिम जमातीकडून व्यक्त करण्यात येत आहे.