मावळ तालुका वारकरी सांप्रदायच्या वतीने आयोजित बालवारकरी अध्यात्मिक शिबिरात 140 बालवारकऱ्यांचा सहभाग…

0
55

कान्हे – मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने निवासी बालवारकरी अध्यात्मिक शिबिर दिनांक 5/5/2022 ते 20/5/2022 पर्यंत आयोजित केले असून या शिबिरात आत्तापर्यंत 140 बालवारकरी यांनी सहभाग घेतला .

या शिबिरात मुलांना हरिपाठ, श्लोक पठण,योगा,गायन, मृदंग शिक्षण असे दैनंदिन शिकवले जात आहे.आज रोजी परमहंस निरंजनंद स्वामी ,साई बाबा सेवाधाम प्रकल्प प्रमुख डॉ. स्वाती वेदक, व्यवस्थापक दत्तात्रेय चांदगुडे यांनी भेट दिली.मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने श्रीफळ व संत तुकारममहाराज यांची गाथा देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.या वेळी मान्यवरां समोर बालवारकरी मुलांनी भजन व श्लोक म्हणून मान्यवरांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळ अध्यक्ष नंकुमार भसे,सचिव रामदास पडवळ, शिबिराचे अध्यक्ष शांताराम गायखे, उपाध्यक्ष रोहिदास जगदाळे ,समाज भुषन धोंडीबा घोजगे,सचिव बळवंत येवले,विभाग प्रमुख गणपत पवार,भाऊ रासे, प्रमुख अभिमन्यू शिंदे, दत्तात्रय घोजगे, विनायक कल्हाटकर,अशोक गरवड आदी मान्यवर उपस्थित होते.