Saturday, September 21, 2024
Homeपुणेमावळमावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगांव शहरातील नवीन फिल्टर पाणी योजनेला तांत्रिक मंजुरी…

मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगांव शहरातील नवीन फिल्टर पाणी योजनेला तांत्रिक मंजुरी…

मावळ (प्रतिनिधी): तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहरातील नवीन पाणी योजनेला तांत्रिक मंजुरी मिळाल्याने आता शहर वासियांच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागणार आहे.
आमदार सुनिल शेळके यांनी वडगाव नगरपंचायत हद्दीतील पाणी योजना, रस्ते, लाईट, बंदिस्त गटारे, आरोग्य सेवा आणि शिक्षण या गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. याच हेतूने वडगाव शहरवासीयांसाठी नवीन पाणी पुरवठा योजनेला सुमारे 39 कोटी 5 लक्ष 96 हजार रूपयांची तांत्रिक मंजुरी देखील मिळाली आहे.
जांभूळ येथे इंद्रायणी नदीवर असलेल्या बंधाऱ्याजवळ जॅकवॉल बांधून लिफ्ट करून 300 मी.मी. व 200 मी.मी. व्यासाच्या पाईप लाईनमधून हे पाणी वडगाव नजीकच्या शिंदे टेकडी व संस्कृती येथे फिल्टर प्लांट बसवून शहराला स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणारी ही ड्रीम प्लानिंग योजना आहे. या आधीचा 4 एमएलडी करुन दिला आहे. या योजनेचे तज्ञांनी सर्व्हेक्षण केले असून जेथून पाणी उचलायचे आहे. त्या जांभूळ बंधाऱ्याची आणि जिथे पाणी शुद्धीकरण करुन साठवायचे त्या संस्कृती आणि शिंदे टेकडी येथील प्लांटच्या जागेची पाहणी पाणी पुरवठा अभियंता यांनी केली असून त्याला हिरवा कंदील मिळाल्याने पुढील कार्यवाही वेगाने सुरु आहे.
जास्तीत जास्त आधुनिक पद्धतीने पुढील 30 वर्षाच्या लोकसंख्येचा विचार करुन वडगावची पाणीपुरवठा योजना साकारणार आहे. कालपर्यंत, खेडी वाटणारी, तळेगाव, वडगाव, कामशेत आणि लोणावळा पुण्याची उपनगरे झाली आहेत. साहजिकच नागरी सुविधांचा ताण वाढू लागला आहे.

मावळचे सुदैव असे की अतिशय चांगला, कर्तव्यदक्ष, दूरदृष्टी असलेला लोकप्रतिनिधी लाभला आहे. माननीय आमदार सुनील आण्णा शेळके यांनी मावळ तालुक्याचा विकास एक रोल मॉडेल म्हणून करण्याचा चंग बांधला असून सर्व नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर भर दिला असून अडीच वर्षात शहराचा चेहरा-मोहरा बदलला आहे.
वडगाव शहराची वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे होणारा नागरी सुविधांवरचा अतिरिक्त भार यामुळे त्यांनी नगरपंचायतीला पुर्ण सहकार्य करुन पुढच्या तीस वर्षातील लोकसंख्या वाढीचा विचार करुन नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत वडगाव नगरपंचायती करीता दूरदर्शी पाणी पुरवठा योजना आखण्यात आली आहे. या करीता भरीव असा निधी उपलब्ध करुन आमदारांनी पुढाकार घेतला आहे. ही पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर पुरेशा दाबाने सर्वांनाच स्वच्छ पाणी मिळणार आहे. ही योजना आखताना 2051 च्या जनगणनेनुसार किती लोकसंख्या वडगाव शहराची असेल त्याचा विचार केलेला आहे.
या महत्वकांक्षी योजनेला अंतिम स्वरुप देण्यासाठी मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी आपले सारे कसब पणाला लावून निधी उपलब्ध करत तंत्रज्ञानाचा वापर करुन हि पाणीपुरवठा योजना पूर्ण करावी असा आमदार सुनील आण्णा शेळके यांचा आग्रह आहे. त्यामुळे विद्युत पुरवठ्याबरोबर सौर उर्जेवर चालणारे पंप बसवण्याबाबतही ते आग्रही आहेत. लवकरात लवकर या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी वडगाव नगरपंचायतीने देखील कंबर कसली आहे. लवकरात लवकर ही योजना कार्यान्वित करण्यासाठी आमदारांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत प्रयत्न करीत आहे. अशी माहिती नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष, पाणी पुरवठा सभापती राजेंद्र कुडे, मुख्याधिकारी विजय सरनाईक यांनी दिली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page