Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमा. नगरसेवक " सोमनाथ आप्पा ठोंबरेंचा " अपक्ष उमेदवार सुधाकर भाऊ घारे...

मा. नगरसेवक ” सोमनाथ आप्पा ठोंबरेंचा ” अपक्ष उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांना पाठींबा !

वाढत्या पाठिंब्याने ” सुधाकर भाऊ घारे ” यांचे हात बळकट..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसे गाव प्रभागातील मा. नगरसेवक सोमनाथ आप्पा ठोंबरे यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांसह अपक्ष उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे . रायगड जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष तथा सभापती सुधाकर भाऊ घारे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत कर्जत – खालापूर मतदारसंघातून अनेक पक्ष , संघटना आणि सामान्य नागरिक उत्स्फुर्तपणे पुढे येवून अपक्ष उमेदवार घारे यांना पाठींबा दर्शवत आहेत. दिवसागणिक वाढत चाललेल्या पाठींब्यामुळे सुधाकर भाऊ घारे यांचे हात अधिक बळकट होत आहेत.

हा पाठींबा सोहळा बुधवार दि. ३० ऑक्टोंबर २०२४ रोजी मा. उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांच्या जनसंपर्क कार्यालयात मा. नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांच्यासह भिसेगावच्या अनेक नागरिकांनी कर्जत परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांची भेट घेवून हि घोषणा केली . यावेळी भगवान शेठ भोईर , मधुकर भाऊ घारे , भानुदास पालकर , मा. नगरसेवक उमेश आप्पा गायकवाड , प्रकाश पालकर तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सोमनाथ आप्पा ठोंबरे हे मुळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य होते , ते कर्जत न. प. वर २ वेळा नगरसेवक झाले आहेत . परंतु महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर त्यांनी तटस्थ भूमिका घेतली होती. सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्ष संघटना बळकटीचं काम अत्यंत प्रभावीपणे झाल्याचे ठोंबरे यांना ज्ञात आहे. त्यामुळे सुधाकर भाऊ घारे यांना कर्जत खालापूर मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणण्यासाठी त्यांचे काम करण्याचा निर्धार , ठोंबरे आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्व सहकऱ्यांनी व्यक्त केला आहे .
- Advertisment -

You cannot copy content of this page