Saturday, April 26, 2025
Homeपुणेकामशेतमा. राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन..

मा. राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन..

कामशेत दि.30 – माजी राज्यमंत्री संजय ( बाळा ) भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी कामशेत शहरच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.मा. राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

या रक्तदान शिबिरामध्ये सकाळी 10 ते दु. 2 या अल्प वेळेत 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले.कामशेत शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा सत्कार कामशेत शहराध्यक्ष मोहन वाघमारे, युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण शिंदे , संजय बेनगुडे,शंकर पिंगळे, संजय लोणकर प्रवीण खोल्लम, रमेश बच्चे, बबलू सुर्वे,नितिन गायखे,राहूल गदिया,शंकर काजळे,कुंदन परमार,रतन जैन,संदिप साठे,सागर साळवे यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विध्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांनी केले तर सदर रक्तदान शिबिरासाठी डॉक्टर सचिन नागोत्रा तसेच जनकल्याण रक्त केंद्र पुणे यांनी विशेष सहकार्य केले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, सभापती ज्योतीताई शिंदे,जेष्ठ नेते माऊली शिंदे,मा.सभापती राजाराम शिंदे,मा.अध्यक्ष प्रशांत ढोरे, बाळासाहेब गोरे, युवा मोर्चा मावळ अध्यक्ष संदीप काकडे ,मावळ महिला आघाडी अध्यक्षा सायलीताई बोत्रे, सभापती गणेश गायकवाड, विश्वनाथ नानेकर, मा.सभापती सुवर्णाताई कुंभार, विद्यार्थी आघाडी अं.मा.अध्यक्ष विठ्ठल तु्र्डे,मा.सरपंच वसंत काळे,मा.उपसरपंच गणपत शिंदे, काशिनाथ येवले,मिनाताई मावकर, जनाबाई पवार,सारिका शिंदे,स्वाती सुर्वे,मावळ आर.पी.आय.नेते संतोष कदम, रुपेश (सोनु) गायकवाड,चंद्रकांत दौडे,अतुल कार्ले, अर्जुन शिंदे, विपिन बाफना, बाळासाहेब गायखे, गिरीश रावळ, पप्पूशेठ गदिया,अंकुश काटकर,योगेश पवार, मोरेश्वर फुगे, जनार्धन जाधव,युवराज शिंदे, रामदास तुपे, आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page