Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" मित्र पक्षांना आपण महायुतीत असल्याचा विसर "..

” मित्र पक्षांना आपण महायुतीत असल्याचा विसर “..

त्यांना उत्तर द्यायला माझे शिवसैनिक खंबीर – आमदार महेंद्र शेठ थोरवे..,पक्ष प्रवेशाने कर्जत मतदार संघात ” शिवसेनेची वज्रमूठ ” अधिक घट्ट…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत खालापूर मतदार संघात मित्र पक्षांना आपण महायुतीत असल्याचा विसर पडला असून चुकीच्या पद्धतीने करत असलेल्या कामाला माझे ” शिवसैनिक ” उत्तर द्यायला ” खंबीर ” असून आजच्या या पक्ष प्रवेशामुळे या मतदार संघात ” शिवसेनेची वज्रमूठ ” अधिक घट्ट झाली असल्याचा ” एल्गार ” समस्त जनसमुदायाला सर्वांनी एकत्र येवून लढा द्यायचा आहे , व पुन्हा एकदा येथे ” भगवा ” फडकवायचा आहे , अशी शपथ या मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी सर्वांकडून – सर्वांसमक्ष घेतली , ते शिवसेना पक्षात कर्जत खालापूर मतदार संघातील सर्व पक्षातील अनेक मात्तब्बर नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा शिवतीर्थ पोसरी – कर्जत येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर पालक मंत्री उदय सामंत , मावळ खासदार श्रीरंग आप्पा बारणे , आमदार भरत शेठ गोगावले , आमदार महेंद्र शेठ दळवी , कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे , डॉ. शिल्पाताई देशमुख – शिवसेना – उपनेत्या , जिल्हाप्रमुख – संतोष शेठ भोईर , उपजिल्हा प्रमुख भाई गायकर , संघटक – विजय पाटील , ता. प्रमुख संभाजी जगताप , संदेश पाटील , रेश्मा म्हात्रे – महिला तालुका प्रमुख कर्जत , सौ. रेश्मा आंग्रे , अमर मिसाळ , रोहित विचारे , सुरेखा शितोळे , संघटक पंकज पाटील , शिवराम बदे , दिलीप ताम्हाणे , सनी चव्हाण , प्रसाद थोरवे , सुभाष गवळे – मा. समाज कल्याण सभापती राजिप. , उत्तम सोनावणे – मा. सरपंच वेणगाव , मा. नगरसेवक ऍड. संकेत भासे , शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , संघटक नदीम भाई खान , संघटीका सायली शहासणे , दिनेश कडू , त्याचप्रमाणे शिवसेना – युवासेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

आज शिवसेना पक्षावर विश्वास ठेवून अनेक दिग्गज नेत्यांचा झालेला या पक्ष प्रवेशा निमित्ताने मी सर्वांचे स्वागत करतो , प्रवेश करणारे सर्व चांगले व्यक्तिमत्त्व असून साऱ्यांनी ” मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ” साहेबांच्या कार्यावर विश्वास ठेवला , त्यांच्या सहकार्यामुळेच मी हजारो करोडो रुपयांचा निधी आणला , यावर आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी प्रकाश टाकला . संपूर्ण महाराष्ट्रात पक्ष प्रवेश होत आहेत , ही आपल्या ” विजयाची नांदी ” आहे , सर्व सामान्य जनता समाधानी असल्याने हा बदल होत असून जनता रस्त्यावर उतरून मुख्यमंत्री पुन्हा शिंदे साहेब होण्यासाठी प्रयत्न करत आहेत . महिला सक्षमीकरण करण्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत , मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा ” ऐतिहासिक निर्णय ” असल्याचे त्यांनी सांगितले . यावेळी त्यांनी महायुतीतील मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खडे बोल सुनावले.
आपण सर्व सज्ज आहात ना , असे आवाहन त्यांनी याप्रसंगी शिवसैनिकांना केला . आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश सोहळा ” न भूतो न भविष्यती ” असाच झाला . खालापूर मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष हनुमंत शेठ पिंगळे यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेची व आमदार महेंद्र शेठ थोरवे यांची ताकद द्विगुणित वाढली असल्याचे चित्र आहे .
- Advertisment -

You cannot copy content of this page