Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमी राष्ट्रवादीचे " सुनील तटकरे " यांचा कार्यकर्ता , त्यांच्या सोबत राहून...

मी राष्ट्रवादीचे ” सुनील तटकरे ” यांचा कार्यकर्ता , त्यांच्या सोबत राहून महायुतीचे काम करणार !

विधानसभा प्रवक्ते ” अमित देशमुख ” यांचा महेंद्र शेठ थोरवे यांना पाठिंबा..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत खालापूर मतदार संघ प्रवक्ते , अमित देशमुख यांनी मी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांचा कट्टर कार्यकर्ता असून त्यांच्या सोबत आहे , मी कुठलाही राजीनामा दिला नसून महायुतीचे काम करून महायुतीचे उमेदवार ” कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांचे काम करून त्यांना प्रचंड मतांनी निवडून देणार , असे नारंगी येथे पत्रकार परिषद घेऊन धमाका उडविला . त्यांच्या या धमाक्याने अपक्ष उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांचा खालापूर तालुक्यातील ” नारंगी ” हा बुरुज ढासळला असल्याचे चित्र येते दिसत आहे .
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा प्रवक्ते देशमुख पुढे म्हणाले की , मी ०३ ऑगस्ट २०२४ रोजी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या सूचनेनुसार येथील नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत कर्जत येथे पक्ष प्रवेश केला होता , त्यावेळी मी भाष्य केले होते तटकरे यांच्या सुचने नुसार पक्ष प्रवेश केला आहे .
महायुतीत मित्र पक्ष म्हणून राष्ट्रवादी होती , पण सुधाकर घारे यांना निवडणूक लढवायची होती , येथील उमेदवारी महेंद्र शेठ थोरवे यांना मिळाली व घारे यांनी राजीनामे देवून बाहेर पडून अपक्ष उमेदवारी लढवत आहेत , यावेळी दिलेल्या काही सामूहिक राजीनामे देताना मला बोलावले नाही , मी उपस्थित नव्हतो , म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनील तटकरे यांच्या सोबतच आहे . मला ” प्रवक्ते ” पद दिले पण जबाबदारी नाही , मी लायक असताना जबाबदारी दिली नाही , मी आजही राष्ट्रवादीत काम करत असून महायुतीचे काम करून माझा धर्म पाळतो , ” परिवर्तन आघाडी ” ही सुधाकर घारे यांनी स्थापन केली आहे , मि महायुतीतील मित्र पक्ष म्हणून राष्ट्रवादीत काम करत असल्याने महा युतीचे उमेदवार आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे काम करणार असा ” गौप्यस्फोट ” अमित देशमुख यांनी केला .

महायुतीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार महेंद्र शेठ थोरवे यांनी या मतदार संघात तब्बल २९०० कोटी चा निधी आणून विकास साधून ” नंदनवन ” केले असल्याने पुढील अधिक विकास कामे करण्यास पुन्हा त्यांनाच निवडून देणे गरजेचे आहे , माझ्यासारखे अजून भरपूर पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादीत असून ते महायुतीचे काम करणार आहेत , मी आणि माझे आदिवासी बांधव महायुतीचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगून , महायुतीचे काम करा अश्या सूचना मला ” आदरणीय तटकरे साहेब ” यांनी दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले .
यापुढे मी महायुतीच्या प्रचार कामात उपस्थित राहणार , सुनील तटकरे यांनी फोन वरून व भेटून तसे सांगितले आहे , पक्ष श्रेष्ठींनी आदेश दिल्यास पुढील पंचायत समिती उमेदवारी लढणार , १६ उमेदवारांना बडतर्फ केले आहे , यांना देखील करतील , हे सांगत स्वतःची पोळी भाजून पक्ष चालवीत असतील तर बडतर्फ करणार , अदृश्य शक्ती ही तटकरे यांची असेल असे वाटत नाही , राजीनामे दिले पण पुढील निर्णय वरिष्ठांवर अवलंबून आहे , पण मी सुनील तटकरे साहेब यांच्या आदेशानुसार मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार महेंद्र शेठ थोरवे यांनाच पाठींबा असल्याचे राष्ट्रवादीचे कर्जत खालापूर विधानसभा प्रवक्ते अमित देशमुख यांनी जाहीर केले . यावेळी त्यांच्या समवेत या प्रभागातील बहुसंख्य कार्यकर्ते , महिला वर्ग व आदिवासी बांधव उपस्थित होते .
- Advertisment -

You cannot copy content of this page