मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर दोन ट्रकचा विचित्र अपघात..

0
122
लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील किमी 40 जवळ आज सकाळी दोन ट्रकचा विचित्र अपघात झाला . यामध्ये सिमेंटची पोती घेऊन जाणाऱ्या ट्रकला तांदूळ वाहतूक करणाऱ्या ट्रकची मागून जोरात धडक बसल्याने हा अपघात झाला .
यामध्ये तांदूळ वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या केबिनमध्ये चालक व क्लिनर आडकले होते .यावेळी आय आर बी पेट्रोलिंग , देवदूत यंत्रणा , डेल्टा फोर्स आणि ॲफकोन कंपनीच्या यंत्रणांनी जखमींना बाहेर काढत योग्य भूमिका बजावली . बोरघाट पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ताबडतोब या घटनेची तीव्रता कमी करून वाहतूक सुरळीत केली. या अपघातात कोणतीही जीवीत हानी झाली नसली तरी हा भीषण अपघात होता.