मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आज सकाळी पुन्हा चार वाहनांचा अपघात…चार जन जखमी..

0
102

खोपोली दि.19: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आज सकाळी चार वाहनांचा अपघात दोन महिलांसह दोन चालक जखमी.

मुबंई पुणे एक्सप्रेस वे वरील अपघाताची मालिका सतत सुरूच असुन आजही सकाळी ढेकू गावाच्या हद्दीत एका बस ने कंटेनर ला पाठीमागुन जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात बस मधील दोन महिला व एक चालक जखमी झाला आहे. तर एका आयसर टेम्पोने पिकअपला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात पिकअप गाडी रस्त्याच्या मधोमध पलटी झाली असून यातील चालक जखमी झाला आहे.

एक्सप्रेस वे वरील अपघातांची मालिका सुरु असून आज सकाळ पासून हा दुसरा अपघात आहे.