मुंबई पुणे जुन्या महामार्गावर लोणावळा येथे अपघात, दुचाकी स्वाराचा उपचारापूर्वी मृत्यू…

0
1661

लोणावळा : मुंबई पुणे जुन्या महामार्गावर हॉटेल पिकाडेल समोर एका अज्ञात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक देऊन अपघात झाला. अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला असून ट्रक पसार झाला आहे.

निजामुद्दीन शमशुद्दीन शेख ( वय 33, रा. भैरवनाथ नगर, कुसगांव, लोणावळा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.निजामुद्दीन हा दि.24 रोजी पहाटे 5:20 च्या सुमारास मुंबई पुणे महामार्गावरून दुचाकी क्र. MH 02 FF3539 घेऊन जात असताना मुंबई कडून पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या अज्ञात ट्रकने त्याला मागून धडक दिली या अपघातात निजामुद्दीन हा रस्ता दुभाजकावर जोरात आदळल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या बाबत गणेश महादेव जाधव ( वय 33, रा. गवळी वाडा,लोणावळा, व्यवसाय मॅगीचे दुकान) याने लोणावळा शहर पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यानुसार लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये रजि.नं.09/2022 प्रमाणे अपघात नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार खबर देणारा – गणेश महादेव जाधव हा दि.24/05/2022 रोजी पहाटे 04 वा.चे सुमारास जुना मुंबई पुणे हायवे रोडवर हाँटेल पिकाडेल समोर त्याचे मॅगीचे दुकाण उघडुन बसला होता. सदर वेळी वाहनांची ये जा चालु होती. गणेश त्याचे गिराईक देत असताना एक निळ्या रंगाचा हायवा ट्रक हा भरधाव वेगात जुना मुंबई पुणे महामार्गावरून मुंबई कडुन पुणे दिशेने जात असताना दिसला,लगेच पिकाडेल हॉटेल जवळ सदर हायवाची कषाला तरी धडक बसल्याचा आवाज झाला व सदर हायवा (नंबर माहीत नाही)हा तसाच पुढे निघुन गेला. सदर ठिकाणी लोकांची गर्दी जमु लागली असता खबर देणारा गणेश सुद्धा सदर ठिकाणी गेला असता त्याठिकाणी होंडा अँक्टीव्हा दुचाकी क्र. MH /02/FF/3539 असा असुन सदर दुचाकी वरील इसम हा गंभीर जखमी अवस्थेत रस्ता दुभाजकावर पडलेल्या अवस्थेत होता व त्याच्या दुचाकीचे ही मोठया प्रमाणात नुकसाण झाले होते. सदर वेळी त्याची काही एक हालचाल होत नसल्याने त्यास रुग्ण वहिकेमधून उपचारासाठी संजीवनी हॉस्पीटल लोणावळा येथे नेले असता डॉक्टरांनी तपासुन तो उपचारापुर्वीच मयत झाला असल्याचे सांगितले व तसे सर्टिफिकेट दिले. सदर वेळी हॉस्पीटल येथे जमलेल्या लोकांकडुन मयताचे नाव पत्ता विचारले असता त्याचे नाव – निजामुद्दीन समशुद्दीन शेख (वय 33 वर्षे,रा. कैलास नगर लोणावळा ) असे असल्याची माहिती लोणावळा शहर पोलिसांनी दिली. अपघात रजि. नोंद करून पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे मॅडम करत आहेत.