Wednesday, June 7, 2023
Homeपुणेलोणावळामुंबई पुणे द्रुतगती मार्गावर टँकर उलटून भीषण अपघात...

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर टँकर उलटून भीषण अपघात…

लोणावळा : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा ते खोपोली दरम्यान “प्रोपोलिन गॅस टँकर ” उलटून भीषण अपघात झाला.या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

सदर चा अपघात km 39.200 ला घडला आहे तसेच अपघातग्रस्त टँकर एका लेन वरून दुसऱ्या लेन वर आल्यामुळे समोरच्या वाहनांना धडक बसली त्यामुळे त्यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला आहे.

बोरघाट पोलीस यंत्रणा , आय आर बी पेट्रोलिंग , देवदूत यंत्रणा , लोकमान्य हॉस्पिटल , डेल्टा फोर्स , महाराष्ट्र सुरक्षा बल , अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था स्पॉट वर मदत कार्यात व्यस्त असून खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य सुरू आहे.

You cannot copy content of this page