मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर कंटेनर व टेम्पो चा भीषण अपघात,,, एकाचा मृत्यू..

0
363

लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज सकाळी 7:00 च्या सुमारास भरधाव ट्रेलरच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रेलर समोर जाणाऱ्या टेम्पोला धडकून पलटी असून या अपघातात ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे . तसेच ट्रेलरच्या भरधाव धडकेने समोरील टेम्पो देखील पलटी झाला आहे.

सकाळची वेळ असल्यामुळे द्रुतगती महामार्गावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत . अपघातग्रस्त वाहने बाजुला करण्यात आली आहेत .

मिळालेल्या माहितीनुसार लोखंडी कॉईल घेऊन मुंबईच्या दिशेने जात असलेल्या ट्रेलर चालकाचा अंडा पॉईट येथील उतार व वळणावर गाडीवरील ताबा सुटला , भरधाव वेगातील या ट्रेलरने समोरील टेम्पोला धडक दिली . या धडकेत टेम्पो पलटी झाला तसेच ट्रेलर देखील पलटी झाला . केबिनचा चक्काचूर झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला . ही दोन्ही वाहने रस्त्यात असल्याने मोठी वाहतूककोंडी झाली होती . तर घाटात कोंडी झाली असल्याचे समजल्याने अनेक वाहनांनी खोपोली व लोणावळा शहरातून प्रवेश केल्याने जुन्या राष्ट्रीय महामार्गावर देखील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या . अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजुला काढण्यात आली असून द्रुतगती महामार्गावरील सर्व लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत .