मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -०४ व पाली खोपोली रस्त्याच्या कामांची चौकशी करा…आम आदमी पार्टी..

0
92

खालापूर (दत्तात्रय शेडगे)
खालापूर चे तहसीलद अय्युब तांबोळी यांना आम आदमी पार्टीने निवेदन देत दिला जनआंदोलन उपोषणाचा इशारा.
खालापूर तालुक्यातून जात असणारे जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक.०४ व खोपोली पाली रस्त्याचे चे चौपदरी करणाचे काम गेल्या पाच वर्षी पासून सुरु असून चार महिन्या पूर्वी मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गांवर डांबरीकरणाचे काम निष्कृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे.

पाऊसाला सुरुवात होताच रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच समजून येत नाही.रस्त्यावर खरी पसरल्याने व खड्ड्यात पाणी तुंबल्याने या मार्गावरून प्रवास करताना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकी व कारचे अदळून वारण वार अपघात होत आहेत. अपघातात अनेकांनी आपले जीव गमावले असून गंभीर दुखापत होऊन अनेक जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.


या दोन्ही महामार्गाच्या कामांची सखोल चौकशी करून ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मांगणी करीत आम आदमी पार्टी ने खालापूर चे तहसीलदार अय्युब तांबोळे यांना निवेदत खड्ड्यात वृक्ष रोपण करून जनआंदोलन व उपोषणाचा इशारा देण्यात आला.या वेळी आम आदमी पक्षाचे डॉक्टर रियाज पठाण, ( रायगड जिल्हा सदस्य) गयासुद्दीन खान, ( खोपोली शहराध्यक्ष ) खालील सुर्वे, ( तालुका अध्यक्ष ) प्रथमेश जाधव, अल्ताफ पटेल, आदित्य गायकवाड,पत्रकार दत्ता शेडगे, पत्रकार सुधीर माने उपस्थित होते.