मुकेश परमार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश..

0
94

लोणावळा : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे माजी लोणावळा शहराध्यक्ष मुकेश परमार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला.

आज तळेगाव दाभाडे येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस संवाद यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर , आमदार सुनिल शेळके , माजी आमदार कृष्णराव भेगडे , जिल्हाध्यक्ष प्रदिप गारठकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत लोणावळा भागातील सनी दळवी , श्रद्धा बाबु यंदे , अमित इंगळे , रविंद्र घारे , बबनराव माने तसेच मावळातील इतर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला.

मुकेश परमार हे भाजयुमोचे माजी शहराध्यक्ष असून त्यांच्या पत्नी सेजल परमार ह्या लोणावळ्याच्या नगरसेविका होत्या . परमार यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनिल शेळके यांचा जाहिर प्रचार केला.सोबतच शेळके यांच्या प्रचाराची धूरा व लोणावळ्यातील कार्यकर्ता नियोजन सांभाळले . परमार हे मागील काही काळापासून शेळके यांचे कट्टर समर्थक म्हणून समजले जात होते.त्यांनी सूचविलेल्या विविध विकास कामांना शेळके यांनी निधी दिला आहे. परमार यांनी विधानसभा निवडणुकीत शेळके यांच्या प्रचाराचे योग्य नियोजन सांभाळले होते . त्यामुळे येणाऱ्या लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत देखील त्यांच्यावर महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील अशी शक्यता आहे .