कार्ला : मावळ लोकसभेचे लोकप्रिय महासंसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्ला परिसरातील गावांसाठी “मुख्यमंत्री वयोश्री योजना” नोंदणी अभियान युवासेना मावळ तालुकाप्रमुख विशाल भाऊसाहेब हुलावळे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते.यावेळी या कार्यक्रमा दरम्यान मावळ लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी भेट दिली.
ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने राबवली आहे. या योजनेमुळे कार्ला परिसरातील गावांतील ज्येष्ठ नागरिकांना लाभ होईल असे प्रतिपादन मावळ लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी व्यक्त केले.या नोंदणी अभियानात मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिकांनी भाग घेतला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरदराव हुलावळे,तालुकाप्रमुख राजूभाऊ खांडभोर, मा.जि.प.सदस्य शेखरभाऊ भोसले,भाजपा प्रदेश सदस्य जितेंद्र बोत्रे,सागर हुलावळे, ग्रा.प.सदस्य सचिन हुलावळे आदी मान्यवर उपस्थित होते. हे अभियान विशाल भाऊसाहेब हुलावळे यांच्या माध्यमातून राबविण्यात आले. यासाठी सुप्रिया जोशी,माऊली हुलावळे यांनी विशेष परिश्रम घेतले.