मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर दोन वाहनांना लागली भीषण आग..कार जळून खाक तर टॅंकरची आटोक्यात आग…

0
246

खालापूर ( दत्तात्रय शेडगे)
मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर रात्रीच्या वेळी दोन वाहनांना भीषण आग लागली, या आगीत एक कार जळून खाक झाली तर एका टॅंकरची आग विझवुन आटोक्यात आणण्यात आली.


मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरून पुण्यहुन मुबंई कडे एक डस्टर कार जात असताना तिला अचानक आग लागली, आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने त्याने तात्काळ कार थांबवून कार मधील प्रवाशी बाहेर पडल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला मात्र यात कार पुर्णपणे जळून खाक झाली.

हा अपघात खोपोली हद्दीत फूडमॉल जवळ घडला तर दुसरा अपघात खालापूर टोल नाक्याजवळ पाली फाटा ब्रिज जवळ एका सिमेंटच्या बल्कर(टॅंकरला) अचानक भीषण आग लागली मात्र या घटनेची माहिती देवदूत यंत्रणेला मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत आग विझवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केल्याने आग विझली.