मैत्रेय सामाजिक युवा प्रतिष्ठान तर्फे कर्जत तालुक्यात कोंढाणे लेणी येथे वृक्षारोपण !

0
191

भिसेगाव- कर्जत (सुभाष सोनावणे) बहुजन वर्गास शिक्षण – नोकरी यांत हजारो अधिकार बहाल करणारे आरक्षणाचे जनक राजेश्री छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ” मैत्रेय सामाजिक युवा प्रतिष्ठान ” ( हालीवली ) कर्जत यांनी महावृक्षरोपण सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता . यावेळी ५०० विविध जातीची झाडे लावून पर्यावरणाला पूरक वातावरण होण्यासाठी देशव्यापी कार्य करण्यात आले.

हा सामाजिक उपक्रम प्रतिष्ठानच्या वतीने कोंढाणे लेणी ता . कर्जत या परिसरात आयोजित करण्यात आला होता.यावेळी मैत्रेय सामाजिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंकुश सुरवसे, उपाध्यक्ष रमेश लादे, सचिव शशिकांत उबाळे, खजिनदार गणेश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन झाला. यावेळी भूमाता पूजन प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सल्लागार राजकुमार भंडारे व संतोष सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले. वृक्षपुजन विशाल तांबे व गणेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. वृक्षारोपण आरंभ अंकुश सूरवसे, शशिकांत उबाळे,निलेश गायकवाड (सामाजिक कार्यकर्ते वडवली ) यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कोंढाणे लेणी चा पूर्व इतिहास व माहिती प्रतिष्ठानचे सल्लागार संतोष सूरवसे व विशाल सरकते यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे सदस्य गोरख सूरवसे, गौरव वानखेडे, प्रशांत उबाळे,गणेश सूरवसे, राजेश जाधव (कडाव – सामाजिक कार्यकर्ते ) मयूर बडेकर, अमित गायकवाड, विजय गायकवाड, श्रेयस वाघमारे, मयूर गायकवाड, धीरज गायकवाड, निहाल उबाळे, विजय कांबळे, बाजीराव कांबळे, अभिषेक साळवे, योगेश तांबे तसेच डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठचे विद्यार्थी हंसराज खोंडे, मिथील पाटील, महेश पाटील व यशवंत खेमार उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रतिष्ठानचे सचिव शशिकांत उबाळे यांनी केले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.