Saturday, September 21, 2024
Homeपुणेवडगावमोरया प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरात महाअभिषेक…

मोरया प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरात महाअभिषेक…

वडगांव(प्रतिनिधी):मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनिल शेळके हे मावळ वासियांचे कुटुंबप्रमुख म्हणुन उत्तमपणे जबाबदारी पार पाडत असताना आण्णांच्या कुटुंबावर व‌ त्यांच्यावर आलेली सर्व संकटे दूर व्हावीत म्हणून मोरया प्रतिष्ठानच्या वतीने मावळचे श्रद्धास्थान असलेले वडगावचे ग्रामदैवत जागृत देवस्थान श्री पोटोबा महाराज माता जोगेश्वरी यांना महाअभिषेक करण्यात आला. तसेच मंदिरास प्रदक्षिणा घालून श्री पोटोबा महाराजांना साकडे घालण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मा तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष जाधव, मा उपसरपंच तुकाराम ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, मा उपसरपंच पंढरीनाथ ढोरे, शिंदे गुरूजी, मोरया प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, नगरसेविका पूनम जाधव, माया चव्हाण, नगरसेवक मंगेश खैरे, राष्ट्रवादी ओबीसी सेल अध्यक्ष अतुल भाऊ राऊत, जेष्ठ नागरिक सेल अध्यक्ष शांताराम कुडे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन ढोरे, युवक अध्यक्ष अतुल वायकर, सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण ढोरे, नितिन भांबळ, सुरेश कुडे, पुजारी सुरेश गुरव, प्रज्योत पेटकर, नितीन चव्हाण, राष्ट्रवादी अल्प संख्याक सेल अध्यक्ष मजहर सय्यद, सचिन कडू, गणेश बरदाडे, सोमनाथ धोंगडे, सिद्धेशभाऊ ढोरे, समीर दौंडे, मयूर गुरव, गौतम सोनवणे, महेश तुमकर, प्रणव ढोरे आदींसह वडगाव शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, मोरया महिला प्रतिष्ठानच्या संचालिका, सभासद वडगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या महाअभिषेक दरम्यान उपस्थित असलेल्या सर्वांचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी आभार व्यक्त केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page