मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पदी अबोली मयूर ढोरे यांची एकमताने निवड…

0
83

वडगाव मावळ : मोरया महिला प्रतिष्ठानची कार्यकारिणी जाहीर त्यानुसार नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून सौ. अबोली मयुर ढोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

गेल्या पाच वर्षापूर्वी मोरया महिला प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी शहरातील महिला भगिनींना अनेक उपक्रमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले . तसेच वडगाव शहरामधील सर्वसामान्य महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी शहरात सात ते आठ महिला सदस्यांना सहभागी करून घेत मोरया महिला प्रतिष्ठान या सामाजिक सेवाभावी संस्थेची स्थापना केली.

आज याच मोरया महिला प्रतिष्ठानच्या बावीस संचालिका, एकशे चाळीस सभासद आणि बचत गटांच्या माध्यमातून तीनशे त्र्याहत्तर महिला सदस्या कार्यरत असून या छोट्याशा रोपट्याचा आज एवढा मोठा महाकाय वटवृक्ष स्थापन झाला आहे.

आज मोरया महिला प्रतिष्ठानचा नुतन महिला पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ श्रीमती कांचन ढोरे, नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे आणि सर्व आजी, माजी संचालिका यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.प्रतिष्ठानची महिला पदाधिकारी कार्यकारणी हि सन 2022 ते 2024 या कालावधीसाठी मर्यादीत असेल.


नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्षा अबोलीताई ढोरे, कार्याध्यक्षा चेतनाताई ढोरे, उपाध्यक्षा प्रतिक्षाताई गट, सचिव ज्योतीताई सुगराळे, सहसचिव गीताताई वाडेकर, चिटणीस शितलताई ढोरे, मिनाक्षीताई ढोरे, जयश्रीताई जेरटागी, खजिनदार सारिकाताई धुमाळ, सहखजिनदार प्रमिलाताई पोटे, प्रसिद्धीप्रमुख कांचनताई ढमाले, नयनाताई भोसले, संचालिका कविताताई नखाते,सोनालीताई मोरे, शर्मिलाताई ढोरे,पुनमताई जाधव, स्वातीताई चव्हाण, छायाताई जाधव, जान्हवीताई ढोरे, सुरेखाताई खांडभोर, ज्योतीताई खिलारे, कुंदाताई ढोरे, स्नेहलताई पाटील यासर्वांची नियुक्ती आज सर्वानुमते करण्यात आली.

गेल्या सलग पाच वर्षापासून मोरया महिला प्रतिष्ठान सामाजिक बांधिलकी जपत जनसेवा हिच खरी ईश्वर सेवा याच जबाबदार वृत्तीने आपण समाजाचे काही देणे लागतो ह्याच इच्छाशक्तीने शहरात महिला भगिनींसाठी विविध स्पर्धात्मक प्रशिक्षण आणि विविध उपक्रमांचे आयोजन करत अहेत.

याचाच भाग म्हणून दरवर्षी सणासुदीला महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा तसेच कुटुंबाला थोडाफार हातभार लागावा या हेतूने “फराळ बनवा व रोजगार मिळवा” हा स्तुत्य उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येतो तसेच याव्यतिरीक्त मोफत नर्सिंग कोर्स, ई लर्निंग कोर्स, शहरातील हौसिंग सोसायटी व वेगवेगळ्या परिसरात बचत गट स्थापन करून राखी बनवणे, गणपती मूर्ती सजावट, साडी विणकाम इत्यादी स्वरुपाचे उपक्रम राबविणे, कोराना काळापासून ते आतापर्यंतही विविध आँनलाईन स्पर्धा, महिला सक्षमीकरण व्याख्यान, हळदीकुंकू, लक्की ड्रा, महिला सन्मान, पूरग्रस्तांना मदत, शाडू मातीचे गणपती बनवणे, फँशन डिझाईन अशा अनेक विविध प्रशिक्षण कोर्सचे आयोजन करण्यात येत आहे.

सर्व नवनियुक्त संचालक मंडळ शहरातील सर्व सामान्य महिला भगिनींचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदैव तत्पर असतील अशी अपेक्षा नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेतनाताई ढोरे यांनी केले तर सूत्रसंचालन नगरसेविका पूनमताई जाधव व आभार अबोलीताई ढोरे यांनी व्यक्त केले.