Friday, December 8, 2023
Homeपुणेवडगावमोरया महिला प्रतिष्ठान माध्यमातून वडगांव शहरातील 150 महिलांसाठी संगणक प्रशिक्षण शुभारंभ व...

मोरया महिला प्रतिष्ठान माध्यमातून वडगांव शहरातील 150 महिलांसाठी संगणक प्रशिक्षण शुभारंभ व जि. प. शाळांना संगणक संच वाटप..

मावळ (प्रतिनिधी):नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या विशेष प्रयत्नाने मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या सहकार्यातून आणि मोरया महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातील जवळपास दिडशे महिला भगिणींसाठी आशादीप कॉम्पुटर येथे सलग दोन महिने मोफत प्रशिक्षण देण्याचा शुभारंभ कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
याव्यतिरीक्त वडगाव शहरामधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावे, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासत मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडगाव जिल्हा परिषद शाळा, केशवनगर व कातवी येथील जिल्हा परिषद शाळांना एकूण सहा संगणक संच भेट देण्यात आले.
सध्याचे युग आधुनिक तंत्रज्ञानाचे आहे. याकडे वाटचाल करीत असताना जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना देखील शालेय स्तरावरच संगणकीय ज्ञान मिळाले पाहिजे. डिजिटल शाळा व मुलांना संगणकाची आवड निर्माण व्हावी, या सर्व बाबींचा विचार करून शाळेमध्ये संगणक असणे गरजेचे आहे. त्यामुळे शाळेला संगणक मिळावा अशी अनेक दिवसांपासून मागणी होत होती.
आता शाळेत संगणक उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना आणि संगणक प्रशिक्षणार्थी महिला भगिनींना याचा नक्कीच फायदा होऊन महिला भगिणींना विविध कंपन्यामध्ये रोजगार मिळू शकेल.अथवा स्वताच्या मुलांना संगणक ज्ञान देण्यास हातभार लावतील अशी अपेक्षा मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांनी व्यक्त केली
या कार्यक्रम प्रसंगी कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सौ. सारिका सुनील शेळके, सिनेक्रॉन टेक्नॉलॉजीचे ॲडमिन मॅनेजर राजेश आगळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा सौ.दिपाली गराडे, आशादीप कॉम्पुटरचे डायरेक्टर आयुब पिंजारी, शिक्षिका शोभा वहिले, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा सौ.अबोली ढोरे, नगरसेविका पुनम जाधव, पुजा वहिले, चेतना ढोरे, प्रतिक्षा गट, जयश्री जेरटागी आणि प्रतिष्ठानच्या संचालिका व शहरातील संगणक प्रशिक्षणार्थी महिला भगिनी आणि शाळा व्यवस्थापन समिती शिक्षका, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच वडगाव शहरातील महिला भगिनींना येणाऱ्या काही दिवसात घरगुती पद्धतीचे रोजगार उपलब्ध करून दिले जाईल असे आश्वासन कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्ष सारिका शेळके यांनी महिला भगिनींना दिले.
- Advertisment -

You cannot copy content of this page