Friday, June 9, 2023
Homeपुणेमुळशीयशवंत व्हा!बुद्धिवंत व्हा!,,, आदर्श सरपंच वत्सला वाळंज यांच्या वतीने विध्यार्थ्यांना शुभेच्छा…

यशवंत व्हा!बुद्धिवंत व्हा!,,, आदर्श सरपंच वत्सला वाळंज यांच्या वतीने विध्यार्थ्यांना शुभेच्छा…

अंबवणे (प्रतिनिधी):सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय आंबवणे येथे इ. 10 च्या विद्यार्थ्यांचा “निरोप समारंभ ” उत्सहात पार पडला.
या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना आपल्या मनोगतात सौ. वाळंज म्हणाल्या की खूप शिका मोठे व्हा पण आई वडिलांनी शाळेने केलेले संस्कार विसरू नका.मुलगी शिकली पाहिजे असे मला मनापासून वाटते. भविष्यात गरज लागली तर नक्की सांगा. यशवंत व्हा! बुद्धिवंत व्हा !
यावेळी नारायण दळवी ,अध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समिती काकाशेठ मेहता, मा.उपसरपंच , योगेश वाळंज अद्यक्ष शिक्षक पालक संघ, भटू देवरे मुख्याध्यापक आदींनी मार्गदर्शनातून इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
छोटी पाहुनी शाल्मली (परी) वाळंज हिने विद्यार्थ्यांना ऑल दी बेस्ट फ्रेंड्स म्हणत शुभेच्छा दिल्या.सुरवातीला मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. दीप प्रज्वलनानंतर विद्यार्थिनींनी स्वागत गीता तुन स्वागत केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यानी विविध फोटो फ्रेम शाळेला भेट दिल्या.
कु निशांत मेहता याने सरस्वती व महाराजांच्या मूर्ती करिता पाच हजार रुपये देऊ केले. सौ.वाळंज ताई यांच्या वतीने सर्व दहावीतील विद्यार्थ्यांना भेट वस्तू व पेन चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उल्हासभाऊ मानकर उपाध्यक्ष यांचे विशेष सहकार्य लाभले.स्वयंप्रेरणेने विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.विद्यार्थ्यानी आपल्या भावना प्रकट केल्या. सर्व शिक्षक कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम यशस्वी झाला.

You cannot copy content of this page