यात्रा काळात कार्ला फाटा येथे पोलिसांकडून वाहनांची तपासणी… दारू बंदी आदेशाची कड अंमलबजावणी !

0
146

लोणावळा : महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील कुलस्वामिनी आई एकविरा देवीची चैत्री यात्रा सुरु झाली असून षष्टी , सप्तमी व अष्टमी असे तीन दिवस ही यात्रा असणार असून. या दिवसांमध्ये एकविरा गडावर लाखो भाविक येण्याची शक्यता असल्याने त्यांना सुलभतेने दर्शन देण्यासोबत वाहतूककोंडी व गर्दी , कार्ला परिसरातील कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी यावर्षी प्रथमच मोठा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ . अभिनव देशमुख व अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील , लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या सूचनेनुसार पोलीस अधिकारी तैनात असून कार्ला फाटा ते एकविरा दरम्यान ठिकठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आले आहे. त्या ठिकाणी दारू बंदी आदेशाची अंमलबजावणी करत सर्व वाहनांची तपासणी सुरु आहे.

मागील दोन वर्ष कोरोनामुळे भाविकांना देवीच्या दर्शनाला येता आले नव्हते तसेच धार्मिक स्थळे व मंदिरे देखील बंद होती . यावर्षी मात्र सर्व निर्बंध हाटविण्यात आल्याने , मुंबई , ठाणे , पुणे , रायगड जिल्ह्यांसह महाराष्ट्राच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने यात्राकाळात दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे.

येणाऱ्या भाविकांना देवीचे दर्शन सुलभतेने घेता यावे , वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूककोंडी व चेंगराचेंगरी असे प्रकार घडू नयेत तसेच भाविकांच्या मनात सुरक्षिततेची भावना रहावी,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता व गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मा . जिल्हाधिकारी यांनी कलम 144 व दारुबंदीचा आदेश लागू केला आहे . यानुसार कार्ला फाटा येथे चेकपोस्ट लावत वाहनांची तपासणी सुरु होत आहे.