युवती सेनेच्या कर्जत – खालापूर विधानसभेच्या, जिल्हा चिटणीसपदी सारिका सावंत..

0
56

खालापूर (दत्तात्रय शेडगे)
मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कर्जत- खालापूर विधानसभेतील युवासेना युवती पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या 12 आँक्टोबर जाहीर केल्या असता कर्जत विधानसभा चिटणीसपदी युवा पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्त्या सारिका सावंत याची निवड झाल्याने सावंत यांच्यावर अभिनदंनाचा वर्षाव होत आहे.


कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघात आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपरिषद, ग्रामपंचायत निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षानी मोठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. तर कर्जत विधानसभा मतदार संघात आमदार महेंद्र थोरवेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पक्ष बांधणी करीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना कामाची पोचपावती म्हणून वरिष्ठ पदावर नियुक्ती करण्यात येत असल्याचे कार्यकर्ते व पदाधिकारी वर्गात उत्साह संचारल्याचे पाहायला मिळत आहे. तर श्रीमती सारीका सावंत यांनी कोरोनाच्या दुस-या लाटेत खालापुर तालुक्यात स्वयं प्रेरणेने तात्पुरत्या स्वरुपात कोवीड रुग्णालय उभारणी करीता सर्व पक्षीय समितीबरोबर खालापुर तालुक्यातील एकमेव युवतीने सक्रीय सहभाग घेऊन तालुक्यासह अनेक रुग्णांना या महामारीतुन आरोग्य संपन्न होण्यास मोलाची मदत झाल्याने त्यांच्या मेहनतीने समाजास लाभ मिळाल्याने सारिका सांवत यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.


हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिवार्दाने, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना रायगड जिल्हा संपर्क संघटक तथा महापौर किशोरिताई पेडणेकर, आमदार महेंद्र थोरवे व जिल्हा संघटक रेखाताई ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत विधानसभा मतदार संघात महिला आघाडीची घौडदौड सुरू असुन महिला पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांना शिवसेना पक्षात आकर्षित करण्यासाठी चांगलीच कंबर कसली असल्याने पक्ष वाढीसाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देत नवनवीन पद जाहीर करण्यात येत असून 12 आँक्टोबर कर्जत विधानसभा चिटणीसपदी युवा पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्त्या सारिका सावंत याची नियुक्ती करण्यात आल्याने सारिका सावंत यांना पुढील वाटचालिकरीता सर्व स्तरावरून शुभेच्छा देण्यात येत आहेत.