रमाबाईंच्या जयंती निमित्त सिद्धार्थ नगर येथे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन…

0
97

लोणावळा : माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त उषाताई जाधव यांच्यावतीने सिद्धार्थ नगर येथील महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर हळदी कुंकू कार्यक्रमात उपस्थित सर्व महिलांना भेट वस्तू देण्यात आल्या.

माता रमाई या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगिनी असून बाबासाहेबांप्रमाणे रमाईंचीही कीर्ती श्रेष्ठ आहे. याबाबत सर्व समाजाला त्यांचा अभिमान असावा, तसेच सर्व महिलांनी रमाई यांचे सद्गुण जोपासावे असे वक्तव्य मंडळाच्या अध्यक्षा उषाताई जाधव यांनी बोलताना व्यक्त केले. तसेच महिलांनी स्त्री शक्तीच्या बळावर जनतेच्या हितासाठी कसे कार्य करावे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी सदर कार्यक्रमाच्या आयोजक व रमाबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा उषाताई धम्मरक्षित जाधव यांसमवेत उपाध्यक्षा हौसाबाई कांबळे, श्वेता सोनवणे, कल्पना मुरलीधर जाधव, लताताई रोकडे, लताताई भोसले, रेश्मा जाधव, प्रिती माळवे, अंकिता गायकवाड, रुपाली कांबळे इत्यादी मंडळ सदस्यांसमवेत शेकडो महिला उपस्थित होत्या.