रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रमाबाई महिला मंडळाच्या वतीने पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले…

0
135

लोणावळा : माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रमाबाई महिला मंडळ सिद्धार्थ नगरच्या वतीने माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून पुष्प हार अर्पण करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमाणे रमाबाई यांची कीर्ती खूप महान होती.”रमाबाई या रमाई ” कशा झाल्या “बाबासाहेब आणि रमाई दादरच्या राजगृह बंगल्यावर राहत होते.त्यावेळी एकदा अचानक बाबासाहेबांना परदेशी काही कामा निमित्त जायचे होते पण रमाईला एकटी घरामध्ये कसे राहायला ठेवायचे म्हणून बाबासाहेब धारवाडच्या त्यांच्या वराळे मित्राकडे रमाईला पाठवले व काही दिवस तिकडेच राहायला सांगितले.ते वराळे काका धारवाड मध्ये लहान मुलांचे वसतीगृह चालवत असत.

त्या वसतीगृहाच्या आवारात अनेक लहान मुले खेळायला येत असत . एकदा अचानक दोन दिवस ते लहान मुले खेळायलाच आली नाही . म्हणून रमाई वराळे काका यांना विचारते दोन दिवस झाली ही मुले कुठे गेली आहेत खेळायला आवारात का आली नाही . त्यावेळी वराळे म्हणाले ती लहान मुले दोन दिवसा पासून उपाशी आहेत.कारण वसतीगृहाला जे अन्न धान्याचे अनुदान महिन्याला मिळायचे ते अजून मिळालेले नाही ते मिळायला अजून तीन दिवस लागतील.

अजून तीन दिवस ही मुले उपाशीच राहणार आहेत .वराळे अगदी कंठ दाटून ते म्हणाले , त्यावेळी रमाई लगेच आपल्या खोली मध्ये जातात आणि रडत बसतात आणि कपाटातला सोन ठेवलेला डबा आणि आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वराळे यांच्याकडे देऊन म्हणाल्या तुम्ही ह्या बांगड्या आणि डबा ताबडतोब विकून किंवा गहान ठेवून ह्या आणि लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेवून या.मी अजून तीन दिवस ही लहान मुले उपाशी नाही पाहू शकत.नव्हता.मग त्यावेळी वराळे त्या बांगड्या आणि डबा घेवून जातात आणि लहान मुलांसाठी जेवणाच्या वस्तू घेवून येतात आणि लहान मुले त्यावेळी पोटभरून जेवण करतात.

खूप आनंदी राहतात.हे पाहून रमाई खूप आनंदी होते . तिचा आनंद गगनात मावत नव्हता.मग त्यावेळी हि सगळी लहान मुले रमाबाई यांना ” रमाआई ” म्हणून बोलायला लागतात. आणि त्या क्षणा पासून रमाबाई हि माता रमाई झाली.आणि ती सगळ्यांची आई झाली.अशा या माय माऊलीच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

यावेळी रमाबाई महिला मंडळ सिद्धार्थ नगर अध्यक्षा उषाताई जाधव, उपाध्यक्षा हौसाबाई कांबळे, श्वेता सोनवणे, कल्पना मुरलीधर जाधव, लता रोकडे, लता भोसले, प्रिती माळवे, अंकिता गायकवाड, रुपाली कांबळे यांसमवेत महिला कार्यकर्त्या मोठया संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी लोणावळा नगरपरिषद कार्यालयाजवळील सर्व महामानवांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करण्यात आले.