राष्ट्रवादीचे मावळातील निर्विवाद वर्चस्व मोडत भोयरे सोसायटीवर भाजपची एकहाती सत्ता…

0
34

टाकवे बुद्रुक : भोयरे सोसायटीच्या भाजप पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचा 10 जागांवर दणदणीत विजय.

मावळ तालुक्यात सर्वत्र सोसायटीच्या निवडणूकाचा धडाका सुरु आहे . अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व दिसून आले आहे . मात्र आंदर मावळातील भोयरे सोसायटी याला अपवाद ठरताना दिसत आहे . भोयरे सोसायटीच्या भाजप पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने ११ जागा पैकी १० जागा जिंकून सोसायटीवर विजय मिळवला आहे . या निकालाने राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पँनला मोठा धक्का बसला असून त्याची केवळ एकच जागा निवडून आणण्यात त्यांना यश आले आहे . भाजपची सत्ता आल्याने सर्व विजयी उमेदवारांची गावातून मिरवणूक काढून भंडाऱ्याची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आला .

भाजप पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे विजयी उमेदवार – चांगदेव अडिवळे , सुदाम आडिवळे , शंकर भोईरकर , सुधीर भोईरकर , बेबी तळावडे , संगीता तळावडे , मधू खापे , संतू मुढारकर , दिनेश पवळे , दत्ता तळावडे तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे – भारत आडिवळे हे विजयी झाले असून आंदर मावळातील भोयरे सोसायटीवर भाजप ची एकहाती सत्ता आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.