Friday, June 9, 2023
Homeपुणेलोणावळाराजमाची गार्डन येथील सुरक्षा कठाडे दुरुस्त करण्यासाठी लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे वनविभागाला...

राजमाची गार्डन येथील सुरक्षा कठाडे दुरुस्त करण्यासाठी लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे वनविभागाला निवेदन…

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा शहर व खंडाळा शहर हे जग प्रसिद्ध असून खंडाळा राजमाची गार्डन येथील सुरक्षा कठाडे तुटून दुरावस्था झाली आहे. वनविभागाने ते तातडीने दुरुस्त करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस कडून करण्यात आली आहे.
खंडाळा राजमाची गार्डन या ठिकाणी अनेक पर्यटक आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी येतात तसेच युवा पर्यटक सुद्धा याठिकाणी मोठी गर्दी करून सेल्फी काढण्यासाठी येत आहेत. या गार्डनचे सुरक्षा कठाडे तुटल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.पर्यटकांची सुरक्षा हे आपले कर्तव्य असून याठिकाणी कोणताही अपघात घडून जीवितहानी होऊ नये त्यासाठी राजमाची गार्डनचे सुरक्षा कठाडे ताबडतोब दुरुस्त करावे या बाबत लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वडगांव मावळ वनविभाग कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहर अध्यक्ष विलास बडेकर, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, प्रवक्ते फिरोज शेख,राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते सुरेश कालेकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page