राजमाची डोनेटर ग्रुपने आदिवासी बांधवांच्या सोबत केली दिवाळी साजरी….

0
291

लोणावळा 31 : राजमाची डोनेटर ग्रुपच्यावतीने दीपावली सणानिमित्त दीपावलीच्या पूर्वसंध्येला राजमाची परिसरातील अतिदुर्गम परंतु निसर्गरम्य अशा वनाटी व फणसराई या आदिवासी पाड्यातील 27 कुटुंबाना लागणारे आवश्यक साहित्यवाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली.


ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर येथील आदिवासी कुटुंबाना अन्न धान्य बरोबर कपडे वाटप करून राजमाची डोनेटर ग्रुपच्या सदस्यांनी आदिवासी कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे.


त्याचप्रमाणे सर्व ग्रुप सदस्यांनी चुलीवर स्वयंपाक करून आदिवासी बांधवांसोबत सहभोजनाचा आनंदही घेतला.
सदर उपक्रमात बाळकृष्ण बलकवडे, यशवंत भालेकर, मिथुन पाठारे, अमित गवळी, दत्ता गाडे, कपिल पाटील,अमोल डोंगरे, योगेश पाटील, मयूर वाळुंज, विकी भालेकर, योगेंद्र जाधव, प्रवीण मोरे, रमेश सावंत, संदीप बेल्हेकर, अतुल नेवासे, देवकांत बनकर, चंदू झोपे, मयूर भालेकर, मनोज बाठे, राज फॅशन लोणावळा इत्यादी सदस्य सहभागी होते.