राजमाता जिजाऊ पुरस्काराने सौ सारिका सुनील शेळके यांचा गौरव…

0
25

तळेगाव दाभाडे : श्री . डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ , समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील विविध क्षेत्रातील महिलांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले.

आयोजित कार्यक्रमात कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका सुनिल शेळके यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार, माळवाडी येथील सावित्रीबाई फुले महिला बचत गटास उत्कृष्ट महिला बचत गट पुरस्काराने गौरविण्यात आले तर शांताबाई मोहन काकडे यांना शांताई आदर्श माता पुरस्कार तसेच डॉ. वर्षा सत्यजित वाढोकर यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात कुसुम शिवाजी वाळुंज, सहकार क्षेत्रात शबनम आमीन खान, साहित्यिक क्षेत्रातील ज्योती नागराज मुंडर्गी, वैद्यकीय क्षेत्रात शोभा पोपट कदम, कृषी व उद्योग क्षेत्रात सुरेखा मनोहर काशीद, संप्रदाय क्षेत्रात चांगुणाबाई जगन्नाथ भेगडे व सांस्कृतिक क्षेत्रातील अंजली विवेक सहस्त्रबुद्धे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी कुलस्वामी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके म्हणाल्या की , महिला केवळ चूल आणि मूल यात मर्यादित न राहता समाजातील सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्य करत आहेत . समाजातील सामजिक संस्थांनी महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान केल्याने त्यांना प्रोत्साहन मिळते . तळेगाव दाभाडे शहरात या कार्यक्रमाचे आयोजन करून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा आपण सन्मान केला त्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.

यावेळी आमदार सुनिल शेळके , माजी आमदार दिगंबर भेगडे , डॉ . कृष्णकांत वाढोकर , राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे , माजी नगरसेवक गणेश काकडे , हभप पंकज महाराज गावडे , रोटरी क्लब ऑफ तळेगावचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे , मिलिंद शेलार , शांताबाई मोहन काकडे , ज्योती शिंदे , सुमती निलवे , शबनम खान , डॉ . वर्षा वाढोकर आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.