राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त देवले येथील विध्यार्थ्यांना स्पोर्ट युनिफॉर्मचे वाटप..

0
15

मळवली – राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंंतीचे औचित्य साधून देवले ग्रामपंचायतीच्या वतिने देवले जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थांना स्पोर्टचे ड्रेसचे वाटप करण्यात आले.

देवले ग्रामपंचायतीच्या वतिने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.त्यानंतर विध्यार्थ्यांमध्ये क्रीडा स्पर्धेची आवड निर्माण व्हावी या हेतूने देवले येथील जिल्हापरिषद शाळेतील सर्व विध्यार्थ्यांना स्पोर्ट युनिफॉर्मचे वाटप करण्यात आले आहे.

यावेळी देवले ग्रामपंचायतचे सरपंच महेंद्र आंबेकर, उपसरपंच सुरेखा जगताप, ग्रामपंचायत सदस्य राजेश फुणसे, संतोष गिरी, निलेश फाटक,सदस्या आश्विनी आंबेकर,मंगल आंबेकर, शारदा उंबरकर ग्रामसेविका तेजस्विनी अमोल माने, लिपीक सागर ठोसर, दत्तू आंबेकर, संतोष कडू, मुख्याध्यापिका स्मिता कुलकर्णी, मनिषा दरेकर अगणवाडी सेविका ललिता आंबेकर,नंदा गाडे,उषा चतुर यांंच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.