राजेंद्र आठवले यांची आर पी आय (A) च्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड…

0
211

मावळ प्रतिनिधी – आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते राजेंद्र आठवले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए च्या महाराष्ट्र प्रदेश सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

राजेंद्र आठवले यांनी दि.22 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांची केंद्रीय कार्यालयात भेट घेतली त्यावेळी त्यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच आठवले यांनी दिपकभाऊ निकाळजे यांच्या उपस्थितीत पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला होता.

या निवडीच्या वेळी महाराष्ट्र प्रदेश कार्यध्याक्ष बाळासाहेब पवार, म.प्र.सचिव आशोक ससाणे, प. महाराष्ट्र युवक अध्यक्ष कैलास केदारी, पुणे जिल्हा अध्यक्ष विकास साळवे, युवक अध्यक्ष अंकुश चव्हाण, डी बी एन ग्रुपचे जिल्हा उपाध्यक्ष ईश्वर ढोले, तालुका युवक अध्यक्ष चंद्रकांत ओव्हाळ, युवक तालुका संघटक सचिन साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.